शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूरच्या मंडलाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

By शिवाजी पवार | Updated: May 30, 2023 17:44 IST

मध्यस्थालाही अटक : जमिनीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्याकडून पैशांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, शिवाजी पवार, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : बेलापूर येथील मंडलाधिकारी सारिका भास्कर वांढेकर (वय ४१) यांनी जमिनीची नोंद करण्यासाठी मध्यस्थाच्या मदतीने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. या प्रकरणी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंडलाधिकारी वांढेकर तसेच त्यांच्या मध्यस्थाला ताब्यात घेतले. त्यांच्यावर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मध्यस्थाचे नाव बाबासाहेब बाबुराव कदम (वय ५२, राजुरी, ता.राहाता) असे आहे. लाचलुचपत विभागाचे पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा घारगे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरद गोर्डे यांनी ही कारवाई केली. कारवाईत दोन हजार रुपये मिळून आले.

श्रीरामपूर तालुक्यातील ऐनतपूर येथील एका तक्रारदाराने याप्रकरणी तक्रार केली होती. वारसा हक्काने मिळालेल्या जमिनीची फेरफारवर नोंदणी करावयाची होती. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी बेलापूर येथील मंडलाधिकारी कार्यालयात लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता. मध्यस्थ बाबासाहेब कदम याने तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पडताळणी दरम्यान मंडलाधिकारी वांढेकर यांनी कदम यांना लाचेसाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.

मंडलाधिकारी वांढेकर या पाच महिन्यांपूर्वी बेलापूर येथे रुजू झाल्या होत्या. त्यांच्या कार्यपद्धतीवर यापूर्वी तक्रारी करण्यात आल्या होत्या. नागरिकांचा त्यांच्याविरूद्ध रोष होता. लाचलुचपतच्या कारवाईमध्ये पथकाचे रमेश चौधरी, संध्या म्हस्के, सचिन सुद्रुक, दशरथ लाड सहभागी झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग