शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

बेलापुरात चार गावठी कट्टे हस्तगत, दोन आरोपी ताब्यात; मिळाली आठ काडतुसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 14:50 IST

विक्री करण्याच्या उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतूसे अवैधारित्या बाळगणाऱ्या दोन आरोपींना तालुक्यातील बेलापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. 

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : विक्री करण्याच्या उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतूसे अवैधारित्या बाळगणाऱ्या दोन आरोपींना तालुक्यातील बेलापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. 

आरोपींकडून एक लाख ४५,७०० रुपये किंमतीचे चार देशी बनावटीचे पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल मिळाला. आरोपी दत्तात्रय सुरेश डहाळे (वय ३४ रा.श्रीरामनगर, शिर्डी, ता.राहाता ) व सुलतान फत्तेमोहमद शेख ( वय २९ रा.महोल्ला गल्ली बेलापूर, ता.श्रीरामपूर ) अशी आरोपींची नावे आहेत. 

हवालदार मनोहर गोसावी यांनी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात  दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, संदिप घोडके, विशाल दळवी, शंकर चौधरी, दिलीप शिंदे, संदिप चव्हाण, सागर ससाणे, रोहित येमुल, रणजित जाधव, उमांकात गावडे, अर्जून बडे सहभागी झाले होते. पोलिसांनी वेशांतर करून सापळा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या.

पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक   स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कारवाई केली आहे.आरोपी दत्तात्रय डहाळे हा सराईत गुन्हेगार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात शस्त्र बाळगणे तसेच खुनाचा प्रयत्न एकूण असे दोन गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. तेथील गुन्ह्यात पोलिस त्याचा शोध घेत होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर