पागोरी पिंपळगाव : पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथे मुळा कालव्याचे पाणी शेतात घुसून शेतीतील पिकांचे व रस्त्याचे नुकसान होत आहे. याकडे लक्ष वेधण्याच्या मागणीसाठी पाथर्डी तालुका मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने रामदास बडे, रामेश्वर कर्डिले यांनी अहमदनगर येथील सिंचन भवन येथील मुळा पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. दरम्यान, मुळाचे उपविभागीय अधिकारी यांच्या आश्वासनानंतर बुधवारी उपोषण मागे घेण्यात आले.
हनुमान टाकळी येथे कोपरे हद्दीतील मुळा कालव्याचे पाणी कालव्यांमधून न जाता कालवा सोडून जात होते. पूर्ण दाबाने पाणी सोडल्यामुळे कालवा शेजारील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर पाणी कोणाच्याही उपयोगाला येत नव्हते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने सदर प्रश्नाकडे कर्मचा-यांनी मुद्दामहून दुर्लक्ष केले. वारंवार शेतक-यांनी संपर्क करून ही कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. यामुळे बडे, कर्डिले यांनी उपोषण सुरू केले होते.
...
मागील आठवड्यात पाहणी केल आहे. हनुमान टाकळी-कोपरे रस्ता हा कच्चा मुरुमाचा आहे. पुलाची एक नळी फुटल्याने पाणी रस्त्यावर आले होते. पाटबंधारे विभागीय कर्मचाऱ्यांनी फुटलेल्या पाईपवर पत्रा व मुरुम टाकून पाणी बंद केले होते. कालव्याच्या पाण्यामुळे पिकाची नुकसान झाल्याची एकही तक्रार उपविभागीय कार्यालयाकडे प्राप्त नाही. पुलाचे बांधकाम नादुरुस्त झालेले आहे. पुलाच्या भिंतीस तडे गेले आहेत. त्यामुळे सदरचा पूल नव्याने बांधणे आवश्यक आहे. या कामाचे सविस्तर अंदाजपत्र तयार करुन मंजुरीसाठी सादर करण्याचा सूचना उपविभागास देण्यात आल्या आहेत. त्याची पुर्तता झाल्यावर त्वरीत काम चालू करण्यात येईल.
-वृषाली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर.