शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून मारहाण;  नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:18 IST

शेतीच्या वादातून एका महिलेसह चार जणांना काठ्या व फावड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (१९ जून) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठारभागातील अकलापूर येथील शेळकेवाडीत घडली. 

घारगाव : शेतीच्या वादातून एका महिलेसह चार जणांना काठ्या व फावड्याने मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (१९ जून) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पठारभागातील अकलापूर येथील शेळकेवाडीत घडली. 

मारहाण करणारे हे पुणे जिल्ह्यासह संगमनेर व अकोले तालुक्यातील आहेत. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात सोमवारी (२२ जून) रात्री उशीरा नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

     नवनाथ शंकर तळपे (वय ३५, रा. शेळकेवाडी, अकलापूर, ता.संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ दादाभाऊ  नरवडे, नवनाथ नरवडे याचा भाऊ, दादाभाऊ नरवडे (सर्व रा. आंबीदुमाला, ता. संगमनेर), नवले (पूर्ण नाव माहित नाही, रा. बेलापूर बदगी, ता.अकोले) व इतर चार अनोळखी व्यक्ती तसेच रवींद्र सहादू सोनवणे (रा.चाळकवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) अशा एकूण नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

दादाभाऊ नरवडे याला मंगळवारी (२३ जून) पोलिसांनी अटक केली. दरम्यान जखमी झालेल्या चौघांवर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारी