शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी कर्ज नाकारल्याने गरिबांच्या घराचे स्वप्न भंगले; सरकारचे गृह प्रकल्प अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 13:06 IST

बँकांनी हात वर केल्याने हा गृहप्रकल्प अडचणीत सापडला असून, शासकीय घरांसाठी पात्र ठरलेल्या नगर शहरातील एक हजार २३८ जणांना हक्काच्या घरावर पाणी सोडावे लागणार आहे.

अण्णा नवथर / अहमदनगर : सरकारने गरिबांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान आवास योजनेला घरघर लागली आहे. बँकांनी हात वर केल्याने हा गृहप्रकल्प अडचणीत सापडला असून, शासकीय घरांसाठी पात्र ठरलेल्या नगर शहरातील एक हजार २३८ जणांना हक्काच्या घरावर पाणी सोडावे लागणार आहे. पहिल्या यादीतील लाभार्थींना कर्जपुरवठा न झाल्याने पुन्हा सोडत काढण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. अशीच स्थिती राज्यातील अन्य शहरांमध्येही असण्याची शक्यता आहे.सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर, हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही योजना आहे. पात्र लाभार्थींना प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपये शासन अनुदान स्वरुपात देणार आहे. उर्वरित रक्कम लाभार्थींकडून वसूल केली जाणार आहे. अहमदनगर शहरात केडगाव, नालेगाव आणि संजयनगर हे तीन प्रकल्प मंजूर आहेत. एक हजार २३८ सदनिकांचे हे प्रकल्प आहेत. यासाठी महापालिकेकडे ११ हजार अर्ज आले होते. यापैकी ५ हजार ५०० जणांनी केडगाव व नालेगाव येथील गृहप्रकल्पास पसंती दिली. पसंती अर्जाची संख्या जास्त असल्याने लाभार्थीची निवड करण्यासाठी सोडत काढण्यात आली. सोडतीव्दारे ८४० लाभार्थीची निवड करण्यात आली. संजयनगर येथील प्रकल्पास २९८ जणांनी पसंती दिली. निवड झालेल्या लाभार्थींना कर्ज मिळावे, यासाठी महापालिकेने बँकांची पायधूळ झटकली. मात्र एकही बँक गोरगरिबांना कर्ज देण्यास राजी नाही.  बँकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने पुढाकार घेण्याचे ठरले. बँकांचे प्रतिनिधी आणि लाभार्थी, यांचे संयुक्त मेळावे घेण्यात आले. बँकांनी मेळाव्यांना हजेरी लावत लाभार्थींशी चर्चाही केली. पण, धनदांडग्यांना कोट्यवधींचे कर्ज देणा-या बँकांनी महापालिकेतून काढता पाय घेतला. गृहप्रकल्पाच्या अनुदानाची रक्कम बँकांना एकरकमी मिळणार आहे. त्याशिवाय कर्जाच्या बदल्यात बँका लाभार्थींच्या सदनिका तारण म्हणून घेणार आहेत. कर्जदारांनी कर्ज न भरल्यास बँका सदनिकांचा लिलाव करू शकतात, असे असताना बँकांनी हे लाभार्थी गरीब असल्याने त्यांना कर्ज नाकारले आहे. कर्ज न मिळाल्याने लाभार्थींनी आपला हिस्सादेखील पालिकेकडे भरला नाही. त्यामुळे ते शासनाच्या योजनेतून बाद झाले. पहिल्या यादीतील लाभार्थी स्वत: चा हिस्सा आणि कर्ज उपलब्ध करू शकले नाहीत. एक लाखांचे कर्ज मिळेनासंजयनगर येथील गृहप्रकल्पासाठी निवड झालेल्या लाभार्थींना अमेरिकेतील स्वयंसेवी संस्थेने प्रत्येकी १ लाख ३५ हजार रुपये अर्थसहाय्य दिले आहे. सरकारी अनुदान २ लाख ५० हजार रुपये मिळणार आहे. त्यामुळे येथील लाभार्थींना १ लाखांचे कर्ज हवे आहे. परंतु, तेदेखील बँकांकडून मिळत नसल्याने हा प्रकल्पही रखडला आहे.

केडगाव व नालेगाव येथील प्रकल्पासाठी लाभार्थींची निवड करण्यात आली. परंतु, कर्ज न मिळाल्याने लाभार्थींनी त्यांच्या हिश्याची रक्कम भरली नाही. तीन महिन्यांची मुदत संपली असून, नव्याने सोडत काढण्यात येणार आहे. संजयनगर येथील प्रकल्पातील लाभार्थींना १ लाखांचे कर्ज हवे आहे. पण ते मिळाले नाही.-आर. जी. म्हेत्रे, प्रकल्प अधिकारी, अहमदनगर.  

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनAhmednagarअहमदनगर