शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

बबनराव पाचपुतेंकडून बनवाबनवीचा कळस

By admin | Updated: September 19, 2014 23:39 IST

श्रीगोंदा : पाचपुतेंच्या कारखान्याने ठिबक सिंचन २० कोटींचे कर्ज काढले आणि कर्जाचे हप्ते थकविले आहे.

श्रीगोंदा : तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या पाचपुतेंच्या साईकृपा साखर कारखान्याने सुमारे ७ हजार शेतकऱ्यांच्या नावावर ठिबक सिंचन २० कोटींचे कर्ज काढले आणि कर्जाचे हप्ते थकविले आहे. भविष्यात कर्जापायी एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण? असा सवाल कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.जगताप पुढे म्हणाले, पाचपुतेंनी शरद पवारांच्या स्वप्नातील हिरडगावच्या माळरानावर इंटीग्रेटेड शुगर प्रकल्प उभा केला. ऊस लागवडीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर उसाचे बिल वर्ग करणेपर्यंत प्रसिद्धीचा गाजावाजा करताना बनवाबनवीचा कळस केला.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेवर दिली नाही. काही शेतकऱ्यांची ऊस बिले थकविली. कामगारांना वेतन नाही. शिवाय ऊस वाहतुकदारांचे कमिशन दिले नाही ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी, ऊस वाहतूकदार कामगार यांच्यावर मोठा अन्याय झाला मात्र पाचपुतेंकडे सत्ता सामर्थ्य असल्याने तक्रारी करून देखील संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे. आपल्यावर कुकडी साखर कारखान्याची कमी वयात जबाबदारी पडली. संचालक मंडळास विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देताना कर्जाचे हप्ते वेळेवर फेडले आणि दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी मदत, रस्ते बंधाऱ्याची कामे कुकडी कारखान्याच्या माध्यमातून मार्गी लावली आहेत याचे मनात समाधान आहे. (तालुका प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मैदानात कितीही उमेदवार उतरले तरी तरुण मित्रांच्या पाठबळावर लढाई जिंकणार, असा विश्वास जगताप यांनी शेवटी व्यक्त केला.