शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब थोरात भाजपात प्रवेश करणार होते, राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 21:03 IST

'विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यात काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. '

लोणी (जि. अहमदनगर):   माझ्या बदनामीचे षड्यंत्र असून काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चाही निरर्थक आहेत. या विरोधात आपण गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतरही आमच्या सुखदु:खाची चिंता करणारे मंत्री बाळासाहेब थोरातच दोन वर्षापूर्वी भाजपामध्ये प्रवेश करणार होते, असा गौप्यस्फोट राधाकृष्ण विखे यांनी केला. त्यासाठी त्यांनी दिल्लीत कोणाच्या भेटी घेतल्या त्यांची नावे आम्हाला जाहीर करायला लावू नका, असा इशारा त्यांनी दिला. माध्यमांशी बोलतांना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

विखे पाटील म्हणाले, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या न झालेल्या भेटीची चर्चा जाणीवपूर्वक सुरु करुन मला बदनाम करण्याचा काहींचा हेतू आहे. या बदनामीकारक चर्चेच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. पक्षाला मिळालेल्या यशात थोरातांचे कर्तृत्व शून्य आहे. त्यांना सर्व अपघाताने मिळाले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यात काँग्रेसला अच्छे दिन आले आहेत. मागील साडेचार वर्षे थोरात गायबच होते.

काँग्रेसचा राज्यात पूर्णपणे फुटबॉल झाला असून, काँग्रेसचे नेतृत्व राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दावणीला बांधले आहे. महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेतून राज्यातील शेतक-यांची फसवणूक झाली आहे. मुख्यमंत्र्यांचा रिमोट कंट्रोल वेगळाच असल्याने स्वत:च्या भूमिकेपासून ते दूर गेल्याने त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांच्या मदतीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारही काही बोलायला तयार नाहीत. 

जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाचजिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होईल. त्यासाठी कोणता पॅटर्न वापरायचा ते वापरु. पण ३१ डिसेंबरला नवा पॅटर्न दिसेल आणि उमेदवार कोण असेल हेही ३१ डिसेंबरलाच जाहीर करु, असे माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड ३१ डिसेंबर रोजी होत आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. या बैठकीनंतर विखे म्हणाले, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच करण्याची जबाबदारी वरिष्ठांनी आमच्यावर सोपवली आहे. त्यासंबंधी चर्चा झाली असून, उमेदवार ३१ डिसेंबरला जाहीर होईल. कोणता पॅटर्न वापरायचा तो वापरु पण अध्यक्ष भाजपाचाच करु.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील