शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय मुलांची १६ वसतिगृहे धोकादायक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 15:56 IST

सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय मुला- मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांच्या दुरुस्तीचे आदेश समाज कल्याण विभागाने दिले होते.

अहमदनगर : सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय मुला- मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांच्या दुरुस्तीचे आदेश समाज कल्याण विभागाने दिले होते. मात्र जिल्ह्यातील १६ वसतिगृह चालकांनी दुरुस्तीचे आदेश धाब्यावर बसविले असून, दुरुस्ती न करताच प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे.  वसतिगृहांच्या इमारती धोकादायक आढळून आल्यास संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे यांनी सांगितले. शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय मुलांसाठी अनुदानित तत्त्वावर वसतिगृह चालविले जातात़. शहरासह नगर जिल्ह्यात विविध संस्थांमार्फत १०६ वसतिगृहे सुरू आहेत. निंबोडी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सप्टेंंबर २०१७ मध्ये वसतिगृहांची पंचायत समितीच्या अधिका-यांकडून पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान जिल्ह्यातील एकूण १९ वसतिगृहांच्या इमारतींची पडझड झाल्याचे निदर्शनास आले होते. तसा अहवाल पंचायत समितीकडून प्राप्त झाला़ या अहवालाच्या आधारे सामाजकल्याण विभागाने वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करण्याचा आदेश दिला होता़ जिल्ह्यातील दोन वसतिगृहे चालविणा-या संस्थांनी नवीन इमारत बांधून आदेशाची अंमलबजावणी केली. या शिवाय राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची डागडुजी करण्यात आली. उर्वरित १६ वसतिगृहांची साधी दुरुस्ती संस्थांनी केली नाही.जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून जिल्ह्यातील सर्व वसतिगृहांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत वसतिगृहांच्या इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित संस्थांच्या पदाधिका-यांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.  मागासवर्गीय मुला- मुलींसाठी वसतिगृहे चालविण्यात येतात. वसतिगृह व्यवस्थापनाकडून मुलांना सुविधा पुरविल्या जात नाहीत.  गतवर्षी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे यांनीही जिल्ह्यातील काही वसतिगृहांना अचानक भेटी दिल्या असता, मुलांना जळालेल्या पोळ्या खाऊ घातल्या जात असल्याचे समोर आले.वसतिगृहांतून पुरविल्या जाणा-या आहारावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता इमारतीच धोकादायक असल्याचे समोर आले. वेळोवळी सूचना देऊन दुरुस्ती केली गेली नाही.  त्यामुळे समाजकल्याण विभागाने ही भूमिका घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद