शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडचे परमिटरूम बियरबार पुन्हा तर्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 13:46 IST

गावाकडची बंद पडलेली दारुची दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने परवाने नूतनीकरणाचे नियम शिथिल केल्याने जिल्ह्यातील सर्वच बंद दुकाने सुरू होण्याच्या मार्गावर असून, कोणत्याही परिस्थितीत बंद दुकाने सुरू करायचीच, असेच शासनाच्या आदेशातून ध्वनित होत आहे.

ठळक मुद्देमद्यविक्री परवाने नूतनीकरण आदेशाने सरकारी यंत्रणाही चक्रावल्यापाच हजार लोकसंख्येचा निकष

अण्णा नवथरअहमदनगर : गावाकडची बंद पडलेली दारुची दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने परवाने नूतनीकरणाचे नियम शिथिल केल्याने जिल्ह्यातील सर्वच बंद दुकाने सुरू होण्याच्या मार्गावर असून, कोणत्याही परिस्थितीत बंद दुकाने सुरू करायचीच, असेच शासनाच्या आदेशातून ध्वनित होत आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी न्यायालयाच्या आदेशाने अवकळा आलेली गावोगावची दारुची दुकाने पुन्हा तर्राट होणार असल्याचे बोलले जाते.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ४ एप्रिल २०१७ रोजी राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील शहरी व ग्रामीण भागातील परमिटरुम व बियरबारला टाळे ठोकण्यात आले होते. मद्यविक्रेत्यांनी या निर्णयाला आव्हान दिले, त्यावरील सुनावणीत शहरी भागातील दुकाने पुन्हा सुरू करण्यास मुभा मिळाली. ग्रामीण भागातील दुकानांबाबत मात्र निर्णय झाला नव्हता. जिल्ह्यातील २८२ दारुची दुकाने बंद आहेत. शासनाच्या गृहखात्याने ३१ मार्च रोजी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. तो राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाला असून, त्यानुसार जिल्ह्यातील बंद पडलेल्या दारू विक्रीच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. बंद पडलेली दुकाने सुरू करताना पाच हजार लोकसंख्येची अट असली तरी त्यास अनेक पर्याय आहेत. त्यामुळे बंद पडलेली जिल्ह्यातील सर्वच दुकाने सुरू होतील, अशी स्थिती आहे. शासनाचे परवानाधारक विक्रेत्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत. यापैकी एक पर्याय पूर्ण करणाऱ्यांनाही दुकान सुरू करता येणार आहे.

 

  • ग्रामीण भागातील दारु विक्री परवान्यांचे नूतनीकरणाबाबत शासनाने ३१ मार्च रोजीच्या आदेशाने परवानगी दिली आहे. यासंदर्भात निकष पूर्ण करणा-या गावांची जिल्हा परिषदेकडून माहिती मागविण्यात आली आहे. - पराग नवलकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क
  •  

ग्रामरक्षक दलाची स्थापनानगर - ५पारनेर - १श्रीरामपूर - २३राहुरी - ३७राहाता - ४शेवगाव -२४पाथर्डी - ४संगमनेर - १अकोले -१७

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरliquor banदारूबंदी