शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे नगर महापालिकेत बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 18:38 IST

अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील पाणीपट्टीत सुमारे एक हजार रुपयांनी दरवाढीची शिफारस केली आहे. याच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्या वतीने तेलीखुंट चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी रिकामे हंडे घेवून सहभाग घेतला.

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील पाणीपट्टीत सुमारे एक हजार रुपयांनी दरवाढीची शिफारस केली आहे. याच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसच्या वतीने तेलीखुंट चौकात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी रिकामे हंडे घेवून सहभाग घेतला. पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, जेवढे दिवस नळाला पाणी येते, तेवढ्याच दिवसांची पाणीपट्टी आकारण्याची मागणी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव ढोणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मुबीन शेख, गणेश भोसले, अमित चव्हाण, मयुर पाटोळे, सागर आडसुळ, पप्पू साळवे, मयुर उन्हाळे आदींनी सहभाग घेतला़ युवक काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरात चार ते पाच वर्षापासून दिवसाआड पाणी पुरवठा चालू आहे. ३६५ दिवसांची पाणीपट्टी आकारुन १५० दिवसांचेच पाणी देण्यात येते. याप्रमाणे पाणीपट्टी देखील १५० दिवसांचीच आकारण्यात यावी. पाणी पुरवठा योजनेचा खर्च व उत्पन्न याचा मेळ घालण्यासाठी पाणीपट्टी वाढ हा पर्याय नसून, शहरातील बेकायदा नळ कनेक्शन शोधणे व त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे, बोगस नळ कनेक्शन नियमीत करावेत, पाणी पुरवठा व्यवस्थेचे वॉटर आॅडिट करावे, बेकायदा व बोगस नळ कनेक्शनला जबाबदार असणा-या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी व अधिका-यांवर आयुक्तांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. पाणीपट्टीतील प्रस्तावित दरवाढ मागे घेऊन नगरकरांना सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाcongressकाँग्रेस