शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
2
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
3
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
4
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
5
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ट्रॅव्हिस हेडचं मोठं वक्तव्य, रोहित-विराटबद्दल म्हणाला...
6
'थामा'मध्ये रश्मिका मंदानाचे दमदार अ‍ॅक्शन सीन्स; म्हणाली, "पहिल्यांदाच मी अशा..."
7
टायटन-रिलायन्ससह 'या' स्टॉक्सचा धमाका! निफ्टीने १२ महिन्यांचा विक्रम मोडला, एका दिवसात २% तेजी
8
दिवाळीत आपलं कुटुंब ठेवा सुरक्षित! फक्त ५ रुपयांत ५०,००० चा विमा; या कंपनीने आणला 'फटाका इन्शुरन्स'
9
‘तुम्ही चुकीचे आहात, पंतप्रधान मोदी ट्रम्प यांना घाबरत नाहीत...’; अमेरिकन सिंगरने राहुल गांधींना फटकारले
10
Kolhapur Crime: धक्कादायक! कोल्हापूरमध्ये सहा नृत्यांगनांनी केला सामूहिकरीत्या जीवन संपवण्याचा प्रयत्न
11
"त्या त्या वेळी तुम्ही आडवे झाले आहात"; शिंदेंच्या नेत्याने थोपटले दंड, भाजपच्या आमदारानेही दाखवले 'बळ'
12
पोस्टाने आता २४ तासांत गॅरंटीड डिलिव्हरी सेवा! टपाल विभागाचे प्रायव्हेट कुरिअर कंपन्यांना आव्हान
13
“शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचे नाही, आधी १ लाख द्या”; उद्धव ठाकरेंची टीका
14
PM मोदींच्या आईबद्दल अपशब्द भोवले, काँग्रेसच्या मोहम्मद नौशादांची उमेदवारी रद्द...
15
युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी
16
Ranji Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळलं, पठ्ठ्यानं रणजी स्पर्धेत काढला राग, ठोकलं द्विशतक!
17
अफगाण सीमेवर आत्मघातकी हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार, दोन्ही देशांमध्ये तणाव कायम
18
काही मिनिटांत झोमॅटोच्या दीपिंदर गोयल यांचे बुडाले ५५६ कोटी रुपये; छोट्या गुंतवणूकदारांनीही हात वर केले, कारण काय?
19
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
20
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका

राहुरीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी एकास पाठलाग करुन पकडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 12:08 IST

राहुरी बसस्थानकासमोर असलेले एटीएम फोडण्याचा चोरटे प्रयत्न करीत असल्याची पोलिसांना चाहूल लागली. अचानक पोलिसांना पाहताच पाच जणांनी येथून पलयान केले़ पोलिसांनी एका चोरट्याचा एक किलोमीटर पाठलाग करुन त्यास मल्हारवाडी शिवारात पकडून अटक केली.

राहुरी : राहुरी बसस्थानकासमोर असलेले एटीएम फोडण्याचा चोरटे प्रयत्न करीत असल्याची पोलिसांना चाहूल लागली. अचानक पोलिसांना पाहताच पाच जणांनी येथून पलयान केले़ पोलिसांनी एका चोरट्याचा एक किलोमीटर पाठलाग करुन त्यास मल्हारवाडी शिवारात पकडून अटक केली. ही घटना रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. दत्तात्रय बोºहाडे (रा.आरडगाव, ता़राहुरी) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्य आरोपींचा राहुरी पोलीस शोध घेत आहेत. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास राहुरी बसस्थानकासमोर असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये अंधारात आवाज येत असल्याचे फिरतीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आले़ पोलीस उपनिरीक्षक शिरसाट यांनी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मािहती दिली़ त्यानंतर पोलिसांचा सुगावा लागताच सहा जण पळून लागले़ यातील एका दरोडेखोराचा पोलिसांनी एक किलोमिटर पाठलाग केला़ आरोपी दत्तात्रय बोºहाडे यास पकडण्यात पोलिसांना यश आले़ मात्र अन्य पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले़घटनास्थळी असलेल्या एटीएमलगत लोखंडी कटवणी, लोखंडी टॉमी व मोठे दोन स्क्रू पोलिसांना आढळून आले़ अंधारामुळे पोलिसांना संशय आल्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले़ मागील वर्षी राहुरी खुर्द येथे एटीएम फोडून रक्कम लंपास करण्यात आली होती़ गजबजलेल्या ठिकाणी आरोपींना केलेला प्रयत्न असफल झाला आहे़ यापूर्वी झालेल्या घटनेशी याचा संबंध आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत़ घटनास्थळी श्वानपथक दाखल झाले़ घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिरसाट यांनी भेट दिली़ पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस़ए़बागुल हे करीत आहेत़राहुरी बसस्थानकासमोर रविवारी पहाटे स्टटे बँकेचे एटीएम फोडीत असताना राहुरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे आर्थिक हानी टळली़ यासंदर्भात एकास अटक करण्यात आली आहे. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले़ अन्य आरोपींचा तपास सुरू आहे़, असे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सांगितले.  

टॅग्स :RahuriराहुरीCrime Newsगुन्हेगारी