शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:41 IST

शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे़ मोकाट कुत्र्याने येथील नंदनवन वसाहतीतील अवधूत श्रीकांत गायकवाड (वय ४) या चिमुकल्यावर हल्ला केला असून,

अहमदनगर : शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याचे सत्र सुरूच आहे़ मोकाट कुत्र्याने येथील नंदनवन वसाहतीतील अवधूत श्रीकांत गायकवाड (वय ४) या चिमुकल्यावर हल्ला केला असून, सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पवननगर भागातील दुर्गा पिंपळे (वय १२), या मुलीला पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली़ या दोघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़बोल्हेगाव येथील मुलावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच सावेडी उपनगरांत एकाच दिवशी कुत्र्याने दोन मुलांवर हल्ला केला़ महापालिका आयुक्त वास्तव्यास असलेल्या नंदनवन वसाहतीतील मोकाट कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात चार वर्षांचा अवधूत गंभीर जखमी झाला़ त्याला उपचारासाठी तातडीने येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ जखमी अवधूतवर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सावेडी उपनगरातील पवननगर येथे पाळीव कुत्र्याने दुर्गा पिंपळे,या बारा वर्षीय मुलीवर हल्ला केला़ या हल्ल्यात दुर्गा गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही मुलांच्या नातेवाईकांची भेट घेऊन चर्चा केली़ या भागातील माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर व उद्योजक शिवाजी चव्हाण यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेतली़ यावेळी जखमीच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली़ यापूर्वी सावेडी उपनगरांत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या असून, या हल्ल्यात अनेकजण जखमीझालेले आहेत़ महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांच्या प्रश्न उपस्थित केला होता़प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु, प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही़ त्यामुळेच कुत्र्यांच्या हल्ल्याचे सत्र शहरात सुरूच असून, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका