कर्जत : कर्जत येथील सहायक निबंधकांची कार रस्त्यात अडवून त्यांच्यावर चौघा अज्ञात व्यक्तिंनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री कर्जत-मिरजगाव रोडववरील चिचोंली फाट्यानजीक घडली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. कर्जतचे सहायक निबंधक अमोल माने हे गुरुवारी कार्यालयीन काम आटोपून रात्री उशीरा कर्जत-मिरजगाव रोडने कारमधून नगरला येत होते. या दरम्यान, चिचोंली फाट्याच्या पुढील माळावर त्यांच्या कारला जीप आडवी लावली. त्यातून आलेल्या चौघा जणांनी त्यांंना ‘आमच्या गाडीला कट का मारला’ अशी विचारणा करून हॉकी स्टीक व काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये अमोल माने हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, या घटनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
कर्जतच्या सहायक निबंधकांवर हल्ला
By admin | Updated: June 10, 2016 23:39 IST