शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींना हटविण्यासाठी अलिबाबा आणि चाळीस चोर एकत्र - देवेंद्र फडणवीस

By अण्णा नवथर | Updated: May 26, 2023 15:13 IST

अहमदनगर येथील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी भाजपचा पदाधिकारी संवाद मेळावा झाला

अहमदनगर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला महासत्ता बनविण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना पाठविण्यासाठी देशातील अलीबाबा आणि चाळीस चोर हे एकत्र येत आहेत अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर येथील पदाधिकारी मेळाव्यात केली.

अहमदनगर येथील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी भाजपचा पदाधिकारी संवाद मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील खासदार डॉक्टर सुजय विखे माजी मंत्री राम शिंदे आदी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, हे चाळीस चोर कितीही एकत्रित आले, तरीही मोदीजींना हटवू शकत नाहीत. त्यांनी 2019 मध्ये देखील यांनी प्रयत्न करून पाहिला होता पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण त्यांच्याकडे एकही राष्ट्रीय नेता नाही. ममता बॅनर्जीची सभा जर अहमदनगर मध्ये ठेवली कोण येणार आहे. शरद पवारांची सभा मणिपूरला ठेवली तर तिकडे कोण जाणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही तोफ डागली. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये कोणाला कोणत्या खुर्चीवर बसायचे पासून सुरुवात आहे राज्यातील हे नेते कधीही एकत्र येऊ शकत नाही एकत्रित त्यांना फक्त एकच काम जमतं ते म्हणजे महा वसुली अशी काही फडणवीस यांनी यावेळी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस