नोंदविलेल्या सर्व उसाचे नियोजन करत कार्यक्षेत्रातील सर्व पिकाचे गाळप करण्याची परंपरा यंदाही कायम राखली. वीज प्रकल्पाद्वारे महावितरण कंपनीला २६ कोटी रुपयांची वीज विक्री केली. डिस्टीलरी प्रकल्पाद्वारे ६३ लाख लीटर स्पिरीट, तर २८ लाख लीटर इथेनॉलची निर्मिती केली, असे कहांडळ यांनी सांगितले.
हंगामात प्रथमच बी हेवी मळीचा वापर स्पिरीट व इथेनॉल निर्मितीसाठी करण्यात आल्यामुळे साखर उतारा कमी झाला. मात्र स्पिरीट, इथेनॉल व मळीच्या उत्पादनात भरीव वाढ झाली.
इथेनॉल व स्पिरीटला चांगला दर मिळत असल्याने त्याचा लाभ ऊस भावामध्ये मिळणार आहे, असे ते म्हणाले.
गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासद, संचालक मंडळ, ऊस तोडणी मजूर, गाडीवान, ट्रक-ट्रॅक्टरचे चालक व मालक, व्यापारी, कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, असे कहांडळ यांनी सांगितले.