शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सेना नगरसेवक दुलम भाजपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 11:23 IST

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे समर्थक व नगरसेवक मनोज दुलम यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

अहमदनगर : शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे समर्थक व नगरसेवक मनोज दुलम यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पद्मशाली समाज दुखावला होता. या समाजाला प्रतिनिधीत्त्व देण्यासाठी भाजपने दुलम यांना पक्षात घेवून शिवसेनेविरुद्ध डाव टाकला आहे.दुलम हे राठोड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र गेल्या सहा महिन्यांपासूनच त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यात छिंदम प्रकरणामुळे पद्मशाली समाज भाजपपासून दूर जाण्याची भिती होती. त्यामुळे खा. गांधी यांनी दुलम यांना पक्षात घेवून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. दिल्ली येथे झालेल्या या प्रवेशाच्यावेळी खा.दिलीप गांधी, नगरसेवक सुवेंद्र गांधी, किशोर डागवाले, अभिजित चिप्पा, सागर गोरे, हेमंत दंडवते उपस्थित होते.यावेळी खा.दानवे म्हणाले, नगर शहराच्या विकासासाठी स्वत: लक्ष घालणार आहे. खासदार दिलीप गांधी यांच्या रूपाने चांगला शहराध्यक्ष लाभला आहे. पुणे, नाशिकच्या धर्तीवर नगरसाठी भरघोस विकास निधी भाजपाचे सरकार देणार आहे.खा. गांधी म्हणाले, दुलम यांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्षाची सावेडी उपनगरातील ताकद वाढणार आहे. दुलम म्हणाले, राज्यात ओबिसींसाठी भाजपाचे सरकार चांगले निर्णय घेत आहे. नगरपालिकेत सतत पाठपुरावा करूनही प्रभागाचा विकास होत नव्हता. त्यामुळे प्रभागाच्या विकासासठी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप देशात, राज्यात प्रगतीपथावर आहे. आता नगरमध्येही भाजपाची सत्ता यावी यासाठी योगदान म्हणून पक्षात प्रवेश केला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका