शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

अर्धशतक धावणारी अँटीक मोटारसायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 14:44 IST

युज अँड थ्रो..च्या जमान्यात राहुरी येथे तीन पिढ्यांपासून राजदूत मोटारसायकल रस्त्यावरून सहज धावत आहेत.

भाऊसाहेब येवलेराहुरी : युज अँड थ्रो..च्या जमान्यात राहुरी येथे तीन पिढ्यांपासून राजदूत मोटारसायकल रस्त्यावरून सहज धावत आहेत. अ‍ॅड़ स्व़ प्रभाकर मेहेत्रे यांनी २७ नोव्हेंबर १९६८ मध्ये ३,१०० रूपयांना खरेदी केलेली एम.एच.यू-१७६० ही मोटारसायकल अँटीक पीस ठरला आहे़ अनेकांनी मोठी रक्कम देऊनही मेहेत्रे परिवाराने ऐतिहासिक ठेवा म्हणून मोटारसायकलची जपवणूक केली आहे़अविनाश मेहेत्रे व त्यांचा मुलगा असा तीन पिढ्यांचा मोटारसायकलचा ऋणानुबंध राहिला आहे़ राहुरी तालुक्यात १९६८ मध्ये पुण्यावरून चार मोटारसायकली आणण्यात आल्या होत्या़ ही मोटारसायकल जागेवर २,७०० रूपयांना खरेदी करण्यात आली़ याशिवाय ४०० रूपये अन्य खर्च आला़ अ‍ॅड़ प्रभाकर मेहेत्रे यांनी राहुरी न्यायालयात ये-जा करण्यासाठी मोटारसायकल खरेदी केली होती़ त्याकाळात मोटारसायकल बघण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असे़ राम नारायण दरक व विश्वनाथ शिंदे यांनी काळाच्या ओघात मोटारसायकली विकल्या़ मात्र मेहेत्रे यांची मोटारसायकल लकी ठरली़ कुठलाही अपघात न करता अखंड ५१ वर्ष अविरत सेवा दिली़ टायर,ट्यूब व पेट्रोल टाकले की हाफ किकमध्ये मोटारसायकल चालू होते़ काळाच्या ओघात मोटारसायकलीला लागणारे स्पेअरपार्ट मिळत नाही़ तरी देखील डुप्लीकेट स्पेअरपार्टच्या माध्यमातून मोटारसायकलची सेवा सुरू आहे़ तब्बल १५० पेक्षा अधिक लोकांना मेहेत्रे यांच्या मोटारसायकलच्या सहाय्याने प्रशिक्षण मिळाले़ त्यामध्ये सत्यवान पवार, संजय कुलकर्णी आदींचा समावेश आहे़ वन किक स्टार्ट होणारी मोटारसायकल एक लिटरला ४२ किलोमीटर अ‍ॅव्हरेज देते़ मोटारसायकलचा रंगही गेल्या ५१ वर्षात बदलण्यात आलेला नाही़ मेहेत्रे परिवारालाही ऐतिहासिक मोटारसायकलचा अभिमान आहे़ अर्धशतक पूर्ण केल्यानंतर मोटारसायकला हार घालून आनंद व्यक्त के ला होता़वडिलांची आठवणगेल्या ५१ वर्षात मोटारसायकलने अविरत सेवा दिली आहे़ कधीही धोका दिला नाही़ नवीन बुलेट घेऊन देतो ही गाडी आम्हाला द्या.. अशा आॅफरही आल्या़ मात्र युनिक पीस व वडिलांची आठवण म्हणून मोटारसायकल विकली नाही़ प्रेरणास्थान म्हणून मोटारसायकल कुणालाही विकली नाही़ -अविनाश प्रभाकर मेहेत्रे, मोटारसायकल मालक, राहुरी.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर