शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

इंदोरीकर महाराज खटल्यात अंनिसचा हस्तक्षेप अर्ज मान्य; लेखी युक्तिवादाला न्यायालयाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 06:28 IST

अंनिसच्यावतीने या प्रकरणात दाखल करण्यात आलेला हस्तक्षेप अर्ज संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी शुक्रवारी सुनावणीवेळी मान्य करत लेखी युक्तिवादाला परवानगी दिली.

संगमनेर (जि. अहमदनगर) : निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात फिर्याद दाखल आहे. अंनिसच्यावतीने या प्रकरणात दाखल करण्यात आलेला हस्तक्षेप अर्ज संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी शुक्रवारी सुनावणीवेळी मान्य करत लेखी युक्तिवादाला परवानगी दिली.इंदोरीकर यांनी वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी १९ जून रोजी संगमनेर न्यायालयात फिर्याद दिली होती.३ जुलै रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. डी. कोळेकर यांच्यासमोर कामकाज झाले होते. त्यानंतर इंदोरीकरांचे वकील के. डी. धुमाळ यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या प्रकरणातील स्थगितीच्या आदेशाची माहिती संगमनेर न्यायालयात दिली. त्यानंतर पुढील सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्यात आली.या प्रकरणात अंनिसच्यावतीने अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली.अंनिसचा अर्ज न्यायालयाने मान्य केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अ‍ॅड. गवांदे यांना लेखी युक्तीवाद करता येणार आहे. पुढील सुनावणी २८ आॅक्टोबर रोजी होणार आहे.

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराज