राळेगणसिद्धी (अहमदनगर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री मिळाले, असे कौतुक आपण करीत होतो, परंतु चार वर्षे झाली, तरी लोकायुक्त कायदा झाला नाही, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली.राळेगणसिद्धी येथे रविवारी रात्री आयोजित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल, लोकायुक्त प्रश्न सोडविण्यासाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे आमरण उपोषण करण्याचा निर्धार अण्णांनी पुन्हा व्यक्त केला.>२४ जानेवारीस निवडक कार्यकर्त्यांची बैठकआंदोलनाच्या जनजागृतीसाठी अण्णा हजारे सोमवारी नवी दिल्लीस रवाना झाले. देशातील विविध संघटनांच्या निवडक कार्यकर्त्यांची २४ जानेवारीस राळेगणसिद्धीत बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.
अण्णा हजारेंची मुख्यमंत्र्यांवर टीका; उपोषणावर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 04:21 IST