शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारेंच्या बदनामीकारक विधानाबाबत नवाब मलिक यांचा लेखी माफीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 14:57 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण काळात चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लेखी पत्र पाठवून अण्णा हजारे यांची माफी मागितली आहे.

ठळक मुद्देज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण काळात चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लेखी पत्र पाठवून अण्णा हजारे यांची माफी मागितली आहे.अण्णा हजारे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत असे  खोटे व बदनामीकारक वक्तव्य मलिक यांनी एका वृत्तवाहिनीवर चर्चा करताना केले होतेमाजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर येथे हजारे यांची माफी मागत, नवाब यांचे वक्तव्य ही पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले होते.

राळेगणसिद्धी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण काळात चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लेखी पत्र पाठवून अण्णा हजारे यांची माफी मागितली आहे.

अण्णा हजारे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत असे  खोटे व बदनामीकारक वक्तव्य मलिक यांनी एका वृत्तवाहिनीवर चर्चा करताना केले होते. या वक्तव्याचा राळेगणसिद्धी परिवाराने तीव्र निषेध करून अण्णांच्या भेटीला निघालेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना राळेगणसिद्धी येथे प्रवेश नाकारला होता. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर येथे हजारे यांची माफी मागत, नवाब यांचे वक्तव्य ही पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले होते.

वक्तव्याचे पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी अशी नोटीस हजारे यांनी २ फेब्रुवारी रोजी मलिक यांना अ‍ॅड. मिलिंद पवार यांच्या मार्फत पाठवून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले होते. त्यावर मलिक यांनी लेखी माफी मागितली. 'माझा हेतू आपले मन दुखावण्याचा नव्हता. तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना आपण देखील आपणास शाब्दिक वाद वाढवायचा नसल्याचे सांगितले आहे. माझ्या पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. आपण वडीलधारी व्यक्ती असूनझालेल्या प्रकाराने आपले मन दुखावले असेल, तर मी देखील दिलगिरी व्यक्त करीत आहे' असे मलिक यांनी माफीनाम्यात म्हटले आहे.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेNCPराष्ट्रवादी काँग्रेस