शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्याही बदल्या; अनिल कटके एलसीबीचे नवे निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 16:56 IST

गेल्या २० दिवसांपासून रिक्त असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी अनिल कटके यांना नियुक्ती मिळाली आहे. ते कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यातून बदलून आले आहेत. याशिवाय इतर सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्याही जिल्हांतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केल्या आहेत. काही अधिकारी नव्याने बदलून आले आहेत.

अहमदनगर : गेल्या २० दिवसांपासून रिक्त असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी अनिल कटके यांना नियुक्ती मिळाली आहे. ते कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यातून बदलून आले आहेत. याशिवाय इतर सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्याही जिल्हांतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केल्या आहेत. काही अधिकारी नव्याने बदलून आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक दिलीप पवार यांची ३१ आॅक्टोबर रोजी पुणे ग्रामीणला बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त होते. या महत्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, तसेच उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले. त्यात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती मिळाली. कटके यांच्याकडे कोपरगाव शहर व तालुका अशा दोन्ही पोलीस ठाण्यांचा पदभार होता. आता हे दोन्ही पदभार शिर्डीचे निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. 

याशिवाय नियंत्रण कक्षातील निरीक्षक संजय सानप यांची तात्पुरत्या स्वरूपात टू प्लस पथकात नेमणूक करण्यात आली आहे. जामखेडचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांना नगर येथील दहशतवादी विरोधी पथकात तात्पुरते संलग्न करण्यात आले आहे. 

घारगाव ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांची श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात, कर्जतचे सपोनि मनोहर इडेकर यांची नगरला तोफखाना ठाण्यात बदली झाली. 

तोफखान्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट यांची श्रीरामपूर शहर ठाण्यात, भिंगारचे उपनिरीक्षक पंकज शिंदे यांची संगमनेर शहर ठाण्यात बदली झाली. 

हे अधिकारी नव्याने हजर सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे हे पाथर्डी ठाण्यात, सपोनि सुनील बडे हे जामखेड ठाण्यात, सपोनि शाहिदखान पठाण हे बीडीडीएस येथे, सपोनि दिलीप तेजनकर हे श्रीगोंदा ठाण्यात, सपोनि दिलीप शिरसाठ हे जिल्हा विशेष शाखेत नव्याने हजर झाले. याशिवाय उपनिरीक्षक रणजित गट हे श्रीगोंदा ठाण्यात, मधुकर शिंदे राहुरी ठाण्यात, अनिल गाडेकर हे ट्रायल मॉनेटरिंग सेलमध्ये, नवनाथ दहातोंडे हे मानवसंसाधन विभागात, अशोक लाड हे शिर्डीत साई मंदिरात, तर उपनिरीक्षक दीपक पाठक हे एमआयडीसी ठाण्यात नव्याने हजर झाले आहेत.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसTransferबदली