शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

...अन् दिवस गोड जाहला : ३५ जणांना अनुकंपातून नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:55 IST

गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत ओशाळलेले चेहरे सोमवारी आनंदाने उजळून निघाले.

अहमदनगर : गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत ओशाळलेले चेहरे सोमवारी आनंदाने उजळून निघाले़ आई-वडिलांच्या मृत्यूपश्चात घराची जबाबदारी आलेल्या ३५ जणांना सोमवारी जिल्हा परिषदेने नोकरीत सामावून घेतले़ अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र हातात पडले अन् अनेक वर्षे वाट पहिलेला तो गोड दिवस हाच, अशा गोड प्रतिक्रियांनी गुंज धरला़जिल्हा परिषदेत अनेक वर्षे सेवा केल्यानंतर सेवेत असताना वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू ओढावलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या पालकांना अनुकंपातून नोकरी दिली जाते़ जुलै २०१७ मध्ये विखे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ६५ जणांना अनुकंपातून जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेतले होते़ यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सभापती उमेश परहर, सदस्य शरद झोडगे, अर्जुन शिरसाठ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, संजय कदम, प्रशांत शिर्के, डॉ़ संदीप सांगळे आदी उपस्थित होते़२०१८ मध्ये अनुकंपा भरती झाली नव्हती़ अनुकंपातून नोकरी मिळावी, यासाठी अनेकजण प्रतीक्षेत होते़ अध्यक्षा शालिनी विखे यांनी पुन्हा अनुकंपातील जागा भरण्याबाबत आग्रही भूमिका मांडली़ त्यास काही सदस्यांनीही पाठिंबा दिला होता़ त्यामुळे प्रशासनाने अखेर अनुकंपा तत्वावरील भरतीला मान्यता दिली़ लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद भरतीची जाहिरात निघाली़ मात्र, अद्याप ही भरती प्रक्रिया पुढे सरकली नाही़ त्यामुळे अनुकंपा भरतीही रेंगाळते की काय, अशी शंका निर्माण झाली होती़अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्यासाठी १४० जणांनी अर्ज केले होते़ शैक्षणिक पात्रतेनुसार ३५ जणांचा सेवेत समावेश करुन घेतला आहे़ यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका १, वरिष्ठ सहायक लिपिक १, वरिष्ठ सहायक लेखा २, शिक्षणसेवक १०, पुरुष आरोग्य सेवक १०, महिला आरोग्य सेवक १, ग्रामसेवक ३, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ४, औषध निर्माण अधिकारी २, पशुधन पर्यवेक्षक १ याप्रमाणे पदनिहाय नियुक्त्या देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद