शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचा शिधा दिवाळीआधीच वाटप होणार, पुरवठा विभागाचे नियोजन

By चंद्रकांत शेळके | Updated: October 27, 2023 22:50 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यंदा या किटमध्ये दिवाळीसाठीच्या सहा वस्तू आहेत. दिवाळीआधीच म्हणजे १० नोव्हेंबरपर्यंत हा शिधा वाटप करण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे.

- चंद्रकांत शेळकेअहमदनगर : दरवर्षीप्रमाणे यंदाही शासनाकडून शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. यंदा या किटमध्ये दिवाळीसाठीच्या सहा वस्तू आहेत. दिवाळीआधीच म्हणजे १० नोव्हेंबरपर्यंत हा शिधा वाटप करण्याचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे.

दरवर्षी शासनाकडून दिवाळीत आनंदाचा शिधा रेशनकार्डधारकांना दिला जातो. यंदा मात्र तो गणेशोत्सवातही देण्यात आला. आता दिवाळीचा शिधा देण्याचे नियोजन सुरू आहे. गणपतीसाठी १०० रुपयांत एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेल या किटमध्ये देण्यात आले होते. आता दिवाळीच्या शिधामध्ये मैदा व पोहे या दोन वस्तू वाढविण्यात आल्या आहेत परंतु त्या अर्धा किलोने कमी झाल्या आहेत. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात दारिद्र्यरेषेवरील तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळेल. जिल्ह्यातील सुमारे पावणेसात लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, गणपतीचा शिधा जनतेपर्यंत वेळेवर पोहोचला नाही. किटमध्ये काही वस्तू कमी आल्या, अशा तक्रारी पुरवठा विभागाकडे नागरिकांनी केल्या. त्याची चौकशी करण्याच्या सूचना पुरवठा विभागाने दिल्या आहेत शिवाय दिवाळीच्या शिधा वाटपात या त्रुटी राहणार नसल्याची खबरदारी पुरवठा विभाग घेत आहे.

हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वितरित करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. परंतु जिल्हा पुरवठा विभागाकडून दिवाळीआधीच म्हणजे १० नोव्हेंबरपर्यंत हा शिधा वाटप करण्याचे नियोजन आहे.- हेमलता बडे, जिल्हा पुरवठा अधिकारी

१०० रुपयांत मिळणार सहा वस्तूआनंदाचा शिधा या किटमध्ये १ किलो साखर, १ किलो खाद्यतेल, तसेच रवा, चणाडाळ, पोहे व मैदा या चार वस्तू प्रत्येकी अर्धा किलो देण्यात येणार आहेत. अशा ६ वस्तूंची किट १०० रुपयांत मिळणार आहे.

पावणेसात लाख लाभार्थ्यांना लाभजिल्ह्यातील ८० हजार अंत्योदय लाभार्थी, तसेच ६ लाख प्राधान्य कुटुंब लाभार्थी अशा सुमारे पावणेसात लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. पुरवठादाराकडून तालुकास्तरावर पुरवठा झाल्यानंतर त्याचे किट करून ते लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAhmednagarअहमदनगर