शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहकारात घोटाळे कोणाचे? समित्या खूप झाल्या आता निर्णय घेणार; अमित शहांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 05:39 IST

पंतप्रधान मोदींनी सहकार मंत्रालय का सुरू केले म्हणून हे शंका घेतात. पण आमचा हेतू प्रामाणिक आहे, असे अमित शहा म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणी (अहमदनगर) :  सहकार चळवळ मोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी मी सहकारमंत्री झालो आहे. विरोधकांनी या चळवळीकडे राजकारण म्हणून पाहू नये. सहकार चळवळीसाठी आजवर समित्याच खूप झाल्या. आता थेट निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी प्रवरानगर येथे केले. 

शहा यांच्या उपस्थितीत सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते.  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, परिषदेचे निमंत्रक राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सुजय विखे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शहा म्हणाले, मोदींनी सहकार मंत्रालय का सुरू केले म्हणून हे शंका घेतात. पण आमचा हेतू प्रामाणिक आहे. आमच्यावर टीका करणारी हीच मंडळी सहकारात विरोधकांच्या संस्थांना कर्ज देताना अडवणूक करतात.

सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचे धोरण 

सहकाराबाबत विद्यापीठ स्थापन करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, असेही शहा यांनी सांगितले. प्रवरानगर येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांनी पहिला सहकारी साखर कारखाना उभारला. येथील मातीवर सर्वांनी माथा टेकविला पाहिजे, असे गौरवोद्गार शहा यांनी काढले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहAhmednagarअहमदनगर