शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर पोलिस अधिक्षकांच्या हप्तेखोरीच्या कथित चर्चेची ऑडिओ क्लीप व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 14:45 IST

अहमदनगर : एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले दत्ताराम राठोड व एक पोलीस कॉन्स्टेबल हप्तेखोरीबाबत चर्चा करत असल्याची कथीत ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या क्लीपमध्ये राठोड हे स्वत:ला माल मिळेल का अशी विचारणा करत असून एका बाईनी जिल्ह्यात फार पैसे कमावले आहेत का असा प्रश्नही कॉन्स्टेबलला विचारत आहेत.

अहमदनगर : एक महिन्यापूर्वी जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले दत्ताराम राठोड व एक पोलीस कॉन्स्टेबल हप्तेखोरीबाबत चर्चा करत असल्याची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या क्लीपमध्ये राठोड हे स्वत:ला माल मिळेल का अशी विचारणा करत असून एका बाईनी जिल्ह्यात फार पैसे कमावले आहेत का असा प्रश्नही कॉन्स्टेबलला विचारत आहेत.

अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांची बुधवारी रात्री बदली झाली. त्यांनी एक महिन्यापूर्वीच नगर जिल्ह्यात अप्पर अधिक्षकपदाचा पदभार घेतला होता. त्यामुळे अचानक बदली कशी झाली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांची व नेवासा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल गर्जे यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लीप व्हायरल झाली? आहे.

--------------

या क्लीपचा सारांश थोडक्यात असा.

नेवासा पोलीस ठाण्यातील गर्जे नावाचे पोलीस कर्मचारी यांनी राठोड यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या कथित चर्चेमध्ये राठोड यांना भेटायला येण्याचे सांगत सगळे काही गोळा करून ठेवले आहे. कारवाई करायची गरज नाही. तुम्ही फक्त आदेश द्या. आपल्याकडे खूप मोठे बाऊन्सर आहेत. फक्त आपण सांगायचा उशिर आहे. आपला शब्द ते खाली पडू देत नाहीत. आम्ही व आमचे डेरे साहेब तुम्हाला भेटायला येतो. आल्यानंतर सविस्तर चर्चा करू, असे गर्जे सांगतात. त्यावर राठोड म्हणतात, तू सांगितले म्हणजे होईल का? त्यासाठी रेड टाकायला तिकडे यावे लागेल का?असा प्रश्न राठोड यांनी गर्जे यांना केला. त्यावर गर्जे म्हणतात, रेड टाकण्याची आवश्यकता नाही. सगळे काही तयार करून ठेवले आहे.

याबाबत राठोड यांची भूमिका जाणून घेण्यासाठी लोकमतने त्यांच्याशी तीनवेळा संपर्क केला. मात्र ते नंतर बोलू, असे म्हणाले.

----

उत्तरेत चांगले मार्केट दिसते

उत्तरेत (उत्तर नगर जिल्हा)चांगले मार्केट आहे. माझी बदली तिकडेच व्हायला हवी होती, असे राठोड यांनी सांगताच, गर्जे म्हणाले, साहेब तुम्ही तिकडे राहिले काय किंवा इकडे, काय फरक पडतो ? आम्ही तुम्हाला भेटायला येतोच. त्यावर राठोड म्हणतात, ह्यनुसताच येतो की माल घेऊन येतोह्ण. बाईने लय कमावले का? असाही प्रश्न राठोड करतात. त्यावर गर्जे म्हणतात, त्यांना प्रत्येक पोलीस ठाण्याकडून ५० लाख रुपयांचा हप्ता येतो. वैयक्तीक वसुली देखील मोठ्या प्रमाणावर आहे. नेवासा तालुक्यातील मोठ्या बियाणे उद्योजकाच्या नावाचाही या क्लीपमध्ये समावेश आहे. हा उद्योजक पोलिसांचा शब्द खाली पडू देत नाही, असे हा कॉन्स्टेबल सांगत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी