शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: पाथर्डीच्या जवखेडे खालसा हत्याकांडातील तिघा आरोपींची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 18:46 IST

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड खटल्यात प्रथम प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधारकर यार्लगडडा यांनी मंगळवारी तिनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

अहमदनगर

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड खटल्यात प्रथम प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधारकर यार्लगडडा यांनी मंगळवारी तिनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव व दिलीप जगन्नाथ जाधव असे निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत.

21 ऑक्टोबर 2014 रोजी जवखेडे खालसा( ता. पाथर्डी, जि. अहमदनगर)  येथे संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव या एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मयत व्यक्ती पती-पत्नी व मुलगा होते. याप्रकरणी मयत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत दिलीप जाधव याने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला होता. 

एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने संपूर्ण राज्य ढवळून निघाले होते. या गुन्ह्याची व्याप्ती पाहून विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र प्रवीण साळुंके दीड महिना घटनास्थळी तळ ठोकून होते. त्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.  या पथकाने या तिहेरी हत्याकांडचा कसून तपास केला. संशयित व काही स्थानिक नागरिकांची नार्को व इतर मानसशास्त्रीय चाचण्या केल्यानंतर मयत जाधव कुटुंबीयांच्या घरातीलच प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव आणि दिलीप जगन्नाथ जाधव यांनी खून केल्याचे तपासात समोर आले होते. त्यावरून या गुन्ह्यात आरोपी प्रशांत दिलीप जाधव यास ३ डिसेंबर २०१४ रोजी आणि अशोक दिलीप जाधव याला ७ डिसेंबर २०१४ रोजी व आरोपी दिलीप जाधव याला १८ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. 

तपास अधिकारी पोलिस निरीक्षक शाशिराज पाटोळे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात महाराष्ट्र शासनाने फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. या खटल्यात मात्र सरकारी पक्षाला आरोपी विरोधातील दोष सिद्ध न करता आल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

टॅग्स :Pathardiपाथर्डीAhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी