शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर पथदिवे घोटाळा: माझ्या जीवाला काही झाल्यास आयुक्तच जबाबदार - काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 14:55 IST

पतीचा पगार बँकेत आहे. पगाराव्यतिरिक्त बँकेत पैसे नाही. तरीही बँक खाते सील केलेय. आता भीक मागून जगायची वेळ आलीय. घर हप्त्याने घेतले असून गाडी, मोबाईलही कर्ज काढू घेतलाय. त्यामुळे देणेकरी दारात आहेत. माझ्या जीवाला काही झाले तर आयुक्तच जबाबदार असतील

अहमदनगर : पतीचा पगार बँकेत आहे. पगाराव्यतिरिक्त बँकेत पैसे नाही. तरीही बँक खाते सील केलेय. आता भीक मागून जगायची वेळ आलीय. घर हप्त्याने घेतले असून गाडी, मोबाईलही कर्ज काढू घेतलाय. त्यामुळे देणेकरी दारात आहेत. माझ्या जीवाला काही झाले तर आयुक्तच जबाबदार असतील, असे महापालिकेतील विद्युत विभागातील कर्मचारी भरत काळे यांच्या पत्नीने सांगितले.महापालिकेत पथदिवे घोटाळा उघडकीस आल्यानंतर यातील आरोपी असलेले भरत काळे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मंगळवारी दुपारी भरत काळे यांची पत्नी प्रतिभा यांनी टिळक रोडवरील कामगार युनियनच्या कार्यालयात पत्रकारांसमोर आपली कैफियत मांडली.प्रतिभा काळे म्हणाल्या, महापालिकेचा विद्युत विभाग ठेकेदारामार्फत चालविला जात असल्याची पत्रे भरत काळे यांनी आयुक्तांना दिली होती. वरिष्ठांकडून त्रास होत असल्यांने विद्युत विभागातून अन्यत्र बदली करावी, अशी मागणीही काळे यांनी आयुक्तांकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने विनाकारण पतीला त्रास झाला. रोहिदास सातपुते अनेकवेळा भरत काळेला धमकी द्यायचे. भरत काळे यांनी पत्रांद्वारे आयुक्तांकडे घोटाळ्याची कल्पना दिली होती. दबाव आणून काम करवून घेतले जात असल्याचे या पत्रात भरत काळे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे भरत काळे हे या प्रकरणात अडकले आहेत, असे प्रतिभा काळे यांनी पत्रकारांना सांगितले.दरम्यान भरत काळे यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रांच्या काही कॉपी प्रतिभा काळे यांना सापडल्या असून, या पत्रांच्या कॉपी त्यांनी कामगार युनियनकडे सुपूर्द केल्या आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका