शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर मनपा : सभापती निवडी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 14:38 IST

महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनोंदणीचा घोळ महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पथ्यावर पडला आहे.

अहमदनगर : महापालिकेतील राजकीय पक्षांच्या गटनोंदणीचा घोळ महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पथ्यावर पडला आहे. पैसे खर्च करून सभापतीपदे मिळविली तर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये कोणतीही विकास कामे करता येणार नाहीत. याच धास्तीने सध्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी आतूर झालेले इच्छुक थंडावले आहेत. सभापतीपदाच्या निवडीची काही घाई नाही, असेच महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्पष्ट केले आहे.महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर निवड झाली. त्यानंतर एक महिन्याच्या आत स्वीकृत सदस्य नियुक्त होणे आवश्यक असते. मात्र बहुजन समाज पक्षाने दुसऱ्यांदा गटनोंदणीचा प्रस्ताव दाखल केला. त्यावर विभागीय आयुक्तांनी अद्याप निर्णय दिला नाही. मात्र या घोळामुळे स्वीकृत, स्थायी समिती आणि महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या नियुक्तीसाठी महापालिकेची विशेष सभा लांबणीवर पडली आहे. आधी स्थायी समितीचे सदस्य नियुक्त होणे आवश्यक आहे. सभापतीपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो. मात्र सदस्यांच्या नियुक्त्याच झाल्या नसल्याने सभापती निवडही सध्या तरी होणे शक्य नाही. दरम्यान सदस्य नियुक्तीसाठी नगरसचिव कार्यालयाने प्रस्ताव तयार केला आहे. मात्र त्याला अद्याप महापौरांनी हिरवा कंदिल दाखविला नाही. नियमानुसार गटनोंदणी एकदाच होते. त्यामुळे सध्याच्या संख्याबळानुसार सदस्य नियुक्ती होऊ शकतो. मात्र बसपाने नव्याने दाखल केलेला प्रस्ताव भाजपच्या पथ्यावर पडला आहे. विशेष सभा बोलविण्याची घाई नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. शक्य झाले तर फेब्रुवारीतच स्थायी समिती सदस्य नियुक्ती होऊ शकते. सभापती निवड झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे सभापती पद घेऊन काय करणार? अशा चर्चा महापालिका वर्तुळात आहेत. आचारसंहितेच्या धास्तीनेच इच्छुकांनीही सध्या तलवार म्यान केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका