शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

अहमदनगर महापालिका निवडणूक २०१८ : भाजपची ३३ जणांची दुसरी यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 20:01 IST

भारतीय जनता पक्षाची ३३ जणांची दुसरी यादी सोमवारी सायंकाळी जाहीर झाली. या यादीमुळे बहुतांश प्रभागातील पॅनल पूर्ण झाले आहेत. दोन्ही याद्यांचे मिळून भाजपने आतापर्यंत ४८ उमेदवार जाहीर केले आहेत.

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाची ३३ जणांची दुसरी यादी सोमवारी सायंकाळी जाहीर झाली. या यादीमुळे बहुतांश प्रभागातील पॅनल पूर्ण झाले आहेत. दोन्ही याद्यांचे मिळून भाजपने आतापर्यंत ४८ उमेदवार जाहीर केले आहेत. आणखी २० उमेदवार भाजप मंगळवारी सकाळी जाहीर करण्याची शक्यता आहे.भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर,पालकमंत्री प्रा. राम शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष तथा खा. दिलीप गांधी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, अ‍ॅड. अभय आगरकर, सुनील रामदासी, किशोर बोरा यांच्या सहीने ही यादी सोमवारी सायंकाळी जाहीर झाली. राष्ट्रवादीचे नगरसेवक कै. कैलास गिरवले यांच्या पत्नी निर्मला कैलास गिरवले यांना भाजपने प्रभाग क्रमांक बारामधून मैदानात उतरविले आहे. कुस्तीपटू अंजली वल्लाकट्टी-देवकर याही मैदानात उतरल्या आहेत. त्यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर करून क्रीडापटूलाही महापालिकेत जाण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

पैसै घेवून उमेदवारी-राजेंद्र काळे

भाजपने पैसे घेवून उमेदवार दिले आहेत. ज्यांचे कोणतेही सामाजिक काम नाही अशांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. सुशिक्षित उमेदवारांना संधी दिली जाते, मात्र भाजपने आम्हाला डावलले आहे. भाजपने उमेदवारी दिली नसली तरी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे असे सी.ए. राजेंद्र काळे यांनी ‘लोकमत’ला प्र्रतिक्रया दिली. काळे यांच्या पत्नी मनीषा काळे- बारस्कर या भाजपच्या विद्यमान नगरसेविका असून त्या पक्षाने तिकिट न दिलेल्या एकमेव नगरसेविका आहेत.

असे आहेत ३३ उमेदवार

प्रभाग १- विद्या दगडे, संदीप कुलकर्णी, प्रभाग २- शीतल गुडा-शेंडे, प्रभाग ३- सय्यद जुबेर बाबामियॉ, सय्यद अब्दुल्ला शाकीर हशम, प्रभाग ४- वंदना शिवाजी शेलार, स्वप्निल शिंदे,प्रभाग ६-डॉ. आरती किरण बुगे, वंदना विलास ताठे, रवींद्र बारस्कर, प्रभाग ७- मोहन कातोरे, कमल कोलते, प्रभाग ८-सुवर्णा विजय बोरुडे, महेश सब्बन, प्रभाग ९- अनुराधा अजय साळवे (आरपीआय), अंजली जितेंद्र वल्लाकट्टी-देवकर, प्रदीप परदेशी, प्रभाग १०-शेख इशरत फैय्याज जहागीरदार, सुनील तमन्ना भिंगारे, नरेश चव्हाण, प्रभाग ११- गयाज शब्बीर कुरेशी, प्रभाग १२-सुरेश नारायण खरपुडे, निर्मला कैलास गिरवले, प्रभाग १३-गायत्री नरेंद्र कुलकर्णी, सोनाली अजय चितळे, मयूर बोचुघोळ, प्रभाग १४- अ‍ॅड. राहुल रासकर, संगीता दीपक गांधी, सुनील ठोकळ, प्रभाग १५-गीतांजली काळे, दत्ता गाडळकर, सुरेखा विशाल खैरे, चंद्रकांत पाटोळे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका