शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर महापालिकेसमोर महिलांनी फोडले माठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 19:54 IST

भिस्तबाग महाल,तपोवन रोड परिसरातील वसाहतीमध्ये अवेळी पाणी पुरवठा होतो, तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी दुपारी महापालिकेसमोर माठ फोडले.

ठळक मुद्देभिस्तबाग महाल परिसरात पाणी टंचाईराष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे आंदोलन

अहमदनगर : भिस्तबाग महाल,तपोवन रोड परिसरातील वसाहतीमध्ये अवेळी पाणी पुरवठा होतो, तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी दुपारी महापालिकेसमोर माठ फोडले. या आंदोलनात आमदार संग्राम जगताप हेही सहभागी झाले. अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांनी आठ दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दोन तास चाललेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक संपत बारस्कर, कुमारसिंह वाकळे यांच्या नेतृत्त्वाखाली महिलांनी महापालिकेवर मोर्चा आणला. या मोर्चात आ. संग्राम जगताप हेही सहभागी झाले आणि त्यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली. आंदोलनातील महिलांनी महापालिकेच्या प्रांगणात दहा ते बारा माठ फोडून महापालिकेचा निषेध केला. त्यानंतर तब्बल दोन ते अडीच तास आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या दिला.भिस्तबाग महाल रोड आणि तपोवन रोड परिसरातील नंदनवन नगर, पवन नगर, गोकुळ नगर, साईराम नगर, तुळजा नगर, जय भवानी नगर, दत्त नगर, तपोवन रोड परिसर, भिस्तबाग महाल रोड परिसरात असलेल्या वसाहतीमध्ये रात्री वेळी-अवेळी पाणी पुरवठा होतो. तो कमी दाबाने असल्याने परिसरात पाणी टंचाई झाली आहे. संपूर्ण भागाला सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा व्हावा, यासाठी भिस्तबाग चौकातील मुख्य जलवाहिनीवरून सध्या अस्तित्त्वात असलेली जलवाहिनी जोडण्यात यावी. त्यामुळे संपूर्ण भागाला वेळेवर आणि समान पाणी पुरवठा करता येणार आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्याने ठिय्या देण्याचा निर्णय प्रभागातील नागरिकांनी घेतल्याचे संपत बारस्कर यांनी सांगितले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते, कुमारसिंह वाकळे, अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, अमित खामकर, गुड्डू खताळ, सचिन लोटके, साधना बोरुडे, आदी सहभागी झाले होते.अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता महादेव काकडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. आठ दिवसांमध्ये २४ इंची मुख्य जलवाहिनीवरून अस्तित्त्वात असलेल्या जलवाहिनीला कनेक्शन जोडून देण्यात येईल. तसेच कॉटेज कॉर्नर, डॉन बॉस्को, सुमन कॉलनी, सागर विहार या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल. तसेच या भागासाठी स्वतंत्र व्हॉल्व्हमन देण्यात येईल, असे आश्वासन वालगुडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSangram Jagtapआ. संग्राम जगताप