शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्र्यांचा फोटो चुकीच्या पद्धतीने केला एडिट; संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

By शेखर पानसरे | Updated: May 21, 2024 21:42 IST

Ahmednagar News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून तो फोटो समाजमाध्यमांतून चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला. त्यामुळे शिवसैनिक तसेच अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली.

- शेखर पानसरे संगमनेर - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून तो फोटो समाजमाध्यमांतून चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आला. त्यामुळे शिवसैनिक तसेच अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली. त्या संदर्भाने मंगळवारी (दि. २१) संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले.

उद्धव सेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी, समन्वयक दीपक साळुंके, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, माजी नगरसेवक नूरमोहम्मद शेख, निखिल पापडेजा, हैदरअली सय्यद, कमलेश उनवणे, अजीज मोमीन, अमोल डुकरे, बंडू म्हाळस, नितेश शहाणे, त्रिलोक कतारी, मोहसीन शेख, पंकज पडवळ, लाला शेख आदी यावेळी उपस्थित होते.

एका व्हॉटस्ॲप समूहात पोस्ट करण्यात आलेला फोटो आक्षेपार्ह आहे, आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचप्रमाणे दोन धर्मात वाद निर्माण करण्याचा संबंधित व्यक्तीचा उद्देश आहे. त्यामुळे कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही केल्याचे उद्धव सेनेचे माजी शहरप्रमुख कतारी यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी