येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथिगृहावर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि. ११) उत्तर विभागाच्या तालुक्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे होते.
यावेळी आमदार लहू कानडे, थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, अहमदनगर शहराध्यक्ष किरण काळे, सचिन गुजर, स्मितल वाबळे, ज्ञानदेव वाफारे, ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ. एकनाथ गोंदकर, लता डांगे, संभाजी माळवदे, रावसाहेब बोठे, सुरेश झावरे, सुभाष सांगळे, विश्वास मुर्तडक, अरुण पाटील, तुषार पोटे, दादा पाटील वाकचौरे, किशोर भनगे, कार्लेस साठे, राजेंद्र वाघमारे, नितीन शिंदे, संजय छल्लारे, अंकुश कानडे आदी उपस्थित होते.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, काँग्रेस पक्षाला समृद्ध अशी परंपरा आहे. सर्व धर्म समभाव व लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या या पक्षाला मानणारा देशात मोठा वर्ग आहे. तरुणांना काँग्रेस पक्षात मोठी संधी असून, आता प्रत्येकाने हा विचार खेडोपाडी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक सक्षमतेने काम करावे.