शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा बँक भरतीचा फेरचौकशी अहवाल संशयास्पद, समितीचे सोयीचे निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 05:39 IST

नगर जिल्हा सहकारी बँकेने २०१६-१७ मध्ये लिपिक, ज्युनिअर आॅफिसर अशा ४६५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली.

- सुधीर लंके अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या कर्मचारी भरतीत उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करताना व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले नाही, तसेच काही उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपीत फेरफार झाल्याचे दिसते या सहकार विभागाच्या गंभीर आक्षेपांकडे याच विभागाने फेरचौकशीत दुर्लक्ष केले आहे. चौकशी अहवालातून भरतीबाबतची संदिग्धता दूर होत नसतानाही विभागीय सहनिबंधकांनी ही भरती वैध ठरवली आहे.नगर जिल्हा सहकारी बँकेने २०१६-१७ मध्ये लिपिक, ज्युनिअर आॅफिसर अशा ४६५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली. या भरती प्रक्रियेत अनियमितता असल्याचे आक्षेप ‘लोकमत’ने उपस्थित केल्यानंतर सहकार विभागाने भरतीची चौकशी केली. त्यात अनियमितता आढळून आल्याने प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्यामुळे निवड यादी जाहीर होऊनही बँकेने नियुक्तीपत्रे दिली नाहीत.भरती प्रक्रिया रद्द करताना ६४ उमेदवारांच्या उत्तरपत्रिका व मुलाखतींच्या गुणांबाबत संशय होता त्याची उदाहरणेच सहकार विभागाच्या चौकशी समितीने दिली होती. भरती रद्द झाल्यानंतर निवड यादीत समावेश असलेल्या उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने संशयास्पद ६४ उमेदवारांची फेरचौकशी करा असे सांगत इतर उमेदवारांना नियुक्ती देण्याचा आदेश दिला.न्यायालयाच्या या निर्णयानुसार नाशिकच्या विभागीय सहनिबंधकांनी विभागीय उपनिबंधक (नाशिक) डी.एस. हौसारे, जिल्हा उपनिबंधक (नगर) दिग्विजय आहेर व सहाय्यक निबंधक (नगर) हरिष कांबळे यांची फेरचौकशी समिती नियुक्त केली. या समितीचा अहवाल ‘लोकमत’ने माहिती अधिकारात मिळविला आहे. चौकशीअंती समितीने काढलेले निष्कर्षच आक्षेपार्ह आहेत. मात्र त्याबाबत विभागीय सहनिबंधक वसंत पाटील यांनी काहीही आक्षेप न नोंदविता संशयास्पद ६४ पैकी ६० उमेदवारांची निवड वैध ठरवली आहे. फेरचौकशी समितीने उत्तरपत्रिकांची चौकशी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे सोपवली होती.फेरचौकशी समितीचा विसंगत अहवालफेरचौकशी समितीने सर्व वादग्रस्त मुद्यांवर आपला निष्कर्ष नोंदविताना तर्कांच्या व शक्याशक्यतेच्या आधारावर निष्कर्ष काढता येणार नाही, असे म्हटले आहे. याच समितीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष व एका संचालकाच्या नातेवाईकाची निवड मात्र रद्द ठरवली आहे. हे उमेदवार पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याने निवड प्रक्रिया ‘प्रभावित होऊ शकते’, असे समितीने म्हटले आहे.इतर सर्व ठिकाणी पहिल्या चौकशी समितीने मांडलेले तर्क फेरचौकशी समितीने उडवून लावले. मग, नातेवाईकांबाबत ही समिती स्वत: असे गृहितक कसे मांडते? हा प्रश्न आहे. पदाधिकारी नातेवाईकांची भरती प्रभावित करु शकतात तसेच इतर उमेदवारांचीही करु शकतात, हे गृहितक समितीने सोयीस्कर दुर्लक्षित केले. हा विसंगत मुद्दा विभागीय सहनिबंधकांनीही विचारात घेतलेला नाही.

टॅग्स :ahmednagar district bankनगर जिल्हा सहकारी बँकAhmednagarअहमदनगर