शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'तो' नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद, आठ दिवसांपासून घालत होता धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 12:31 IST

बिबट्या सावरगाव हद्दीत सटवाई दर्याच्या वरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पहाटे तीन वाजेनंतर जेरबंद झालेल्या या बिबट्याने पिंजऱ्यातील बोकडाचा सकाळपर्यंत जवळपास निम्म्याने फडशा पाडला होता. 

ठळक मुद्देबिबट्या सावरगाव हद्दीत सटवाई दर्याच्या वरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.पहाटे तीन वाजेनंतर जेरबंद झालेल्या या बिबट्याने पिंजऱ्यातील बोकडाचा सकाळपर्यंत जवळपास निम्म्याने फडशा पाडला होता. दरम्यानच्या काळात त्याने गर्भगिरीतील अनेक रानडुकरांचा फडशा पाडला.

अहमदनगर - पाथर्डी येथील वन परिक्षेत्राच्या हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला गुरुवारी पहाटे यश आले. बिबट्या सावरगाव हद्दीत सटवाई दर्याच्या वरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पहाटे तीन वाजेनंतर जेरबंद झालेल्या या बिबट्याने पिंजऱ्यातील बोकडाचा सकाळपर्यंत जवळपास निम्म्याने फडशा पाडला होता. या बिबट्याने आठ दिवसात तीन मुलांना ओढून नेले होते. यात त्यांचा मृत्यू झाला होता. 

बिबट्या शोध मोहीम कामी अहमदनगर, पुणे, जळगाव, औरंगाबाद, बीडची पथके पाच दिवसांपासून अहोरात्र कार्यरत होती. गुरुवारी पहाटे आष्टी वन परिक्षेत्र हद्दीत भक्ष्याच्या शोधार्थ सावरगाव सटवाई दर्याचे पठारावर बिबट्या आला होता. पिंजऱ्यातील बोकडाचा  फडशा पाडतानाच पिंजऱ्याचा दरवाजा बंद होऊन तो जेरबंद झाला. 

शिरापूर डोंगराच्या माथ्यावर सावरगाव (ता. आष्टी) वन विभागाची हद्द आहे. शिरापूर, पानतासवाडी, करडवाडी, सटवाईदरा ओढा, गाढवदरा परिसरात बिबट्या गेल्या अनेक दिवसांपासून वावरत होता. दरम्यानच्या काळात त्याने गर्भगिरीतील अनेक रानडुकरांचा फडशा पाडला. भक्ष्याची वानवा झाल्याने तो मानवी वस्त्याकडे वळला होता.

टॅग्स :leopardबिबट्याAhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र