शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर-बीड रेल्वेची वेग चाचणी यशस्वी; नारायणडोहो ते सोलापूरवाडी दरम्यान धावली रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 19:30 IST

अहमदनगर ते बीड रेल्वे मार्गावर सोमवारी यशस्वी वेग चाचणी झाली. यानिमित्त अहमदनगरहून निघालेल्या रेल्वेने मराठवाड्यात पहिल्यांदा प्रवेश केला. नारायणडोहो ते सोलापूरवाडी (जिल्हा बीड) या २३ किलोमीटर अंतराची ही चाचणी यशस्वी ठरली.

योगेश गुंडकेडगाव : चार वर्षांपासून सुरू असलेल्या अहमदनगर ते बीडरेल्वे मार्गावर सोमवारी यशस्वी वेग चाचणी झाली. यानिमित्त अहमदनगरहून निघालेल्या रेल्वेने मराठवाड्यात पहिल्यांदा प्रवेश केला. नारायणडोहो ते सोलापूरवाडी (जिल्हा बीड) या २३ किलोमीटर अंतराची ही चाचणी यशस्वी ठरली.अहमदनगर व मराठवाड्यास जोडणाऱ्या अहमदनगर-बीड-परळी या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गामुळे अहमदनगर व बीड जिल्ह्याची वाहतूक अधिक सोयीस्कर होणार आहे. २०१७ मध्ये नगर रेल्वेस्थानक ते नगर तालुक्यातील नारायणडोहो या २५ किलोमीटर अंतराची चाचणी यशस्वी झाल्यांनतर नारायणडोहो ते सोलापूरवाडी (ता. आष्टी, जि. बीड) या दुसऱ्या टप्प्यातील २३ कि. मी.अंतराचे काम नुकतेच संपले. या मार्गावरील वेग चाचणीसाठी महिनाभरापासून तयारी सुरू होती.त्यानुसार या मार्गावरील गावकऱ्यांना दोन दिवसांपासूनच सावध करण्यात आले होते. सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन, मुख्य प्रशासकीय अधिकारी एस.के.तिवारी, मुख्य अभियंता दिनेश कटारिया, मंडळ रेल्वे व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा, उपमुख्य अभियंता चंद्रभूषण, कार्यकारी अभियंता व्ही.पी.पैठणकर, अभियंता विद्याधर धांडोरे आदी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या देखरेखीखाली ही चाचणी घेण्यात आली.यावेळी या रेल्वेगाडीने ताशी १२२ कि.मी.अंतर कापत बीड जिल्ह्यातील सोलापूरवाडी गाठली. ही चाचणी यशस्वी झाल्याने सर्व वरिष्ठ अधिकाºयांनी जल्लोष करीत समाधान व्यक्त केले. या मार्गाचा तिसरा टप्पा सोलापूरवाडीपासून सुरू होणार आहे. उर्वरित कामही वेगाने सुरू असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBeedबीडrailwayरेल्वे