शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात उद्या चक्काजाम : शाळा, कॉलेज बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 17:08 IST

सकल मराठा क्रांती मोर्चा दरम्यान कायगाव टोका येथे झालेल्या दुर्देवी घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी अहमदनगर शहर बंद व महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा मराठा समाजाच्या मंगळवारी दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

अहमदनगर: सकल मराठा क्रांती मोर्चा दरम्यान कायगाव टोका येथे झालेल्या दुर्देवी घटनेच्या निषेधार्थ उद्या बुधवारी अहमदनगर शहर बंद व महामार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा मराठा समाजाच्या मंगळवारी दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.येथील हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे अहमदनगर सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. बैठकीस समन्वयक बाळासाहेब पवार, गोरख शिंदे, अभिषेक कळमकर, सतीष मरकड, संजय गाडे, बहिरणाथ वाकळे, यशवंत तोडमल, रेखा जरे, सविता मोरे, अभिजित वाघ, अभिजित खोसे आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला आंदोलनादरम्यान कायगाव टोका येथे मृत पावलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कायगाव टोका येथील दुर्देवी घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंद हाक देण्यात आली असली तरी नगरमध्ये दुसऱ्या दिवशी बुधवारी बंद पुकारण्यावर यावेळी चर्चा झाली. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एक दिवस उशिराने बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बाळासाहेब पवार यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, मराठा समाजाच्या वतीने लाखोंचे मोर्चे काढण्यात आले. परंतु, त्याची दाखल घेत गेली नाही. मराठा समाजावर हा अन्याय असून, अन्यायाविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  कायदा हातात न घेता शहर बंद आणि त्यानंतर शहरातून जाणारे सर्व महामार्गावरील वाहतूक रोखण्यात येईल. आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी सायंकाळी सात वाजता बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.शाळा महाविद्यालये आठ दिवस बंदसमाज बांधवाचा आंदोलनादरम्यान दुर्देवी अंत झाला. आठ दिवस शहरासह उपनगरांतील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन स्मायलिंग अस्मिताचे यशवंत तोडमल यांनी केले. शहरातील शाळकरी मुले, महाविद्यालयीन तरुण आठ दिवस शाळेत न जाता घरी बसतील. ते आंदोलनातही सहभागी होणार नाहीत. शहरातील शाळा व महाविद्यालयांच्या प्रमुखांची भेट घेऊन आंदोलनाबाबत चर्चा करण्यात येईल. त्यांनी आंदोलनास पाठींबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.शहरवाशीयांची गैरसोय टाळण्यासाठी जनजागृतीशहर बंदमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी शहराह उपनगरांत आंदोलनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. मंगळवारी दिवसभर रिक्षा फिरविण्याचेही यावेळी ठरले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmarathaमराठा