शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन तासातच विकले कृषी विद्यापीठाचे कांदा बियाणे; खरेदीसाठी शेतक-यांची झुंबड, ४२२० किलो बियाणांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:56 IST

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाव्दारे सोमवारी आॅनलाईन कांदा बियाणे विक्री सुरु झाली होती. सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत या तीन तासातच विद्यापीठाचे बियाणे विकले गेले. कांदा बियाणांसाठी शेतक-यांना मोठी धावपळ करावी लागली. अनेकांना पैसे भरुनही बियाणे मिळाले नाही.

राहुरी : येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाव्दारे सोमवारी आॅनलाईन कांदा बियाणे विक्री सुरु झाली होती. सकाळी १० वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत या तीन तासातच विद्यापीठाचे बियाणे विकले गेले. कांदा बियाणांसाठी शेतक-यांना मोठी धावपळ करावी लागली. अनेकांना पैसे भरुनही बियाणे मिळाले नाही. नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी सकाळी दोन तास विद्यापीठाची आॅनलाईन साईट ओपन झाली नाही. त्यानंतर फार्म भरुन ३६ तासात एनएफटी अथवा आरटीजीएसने पैसे भरण्यास सांगितले. परंतु पैसे भरल्याशिवाय फार्म सबमीट होत नव्हते. त्यामुळे शेतकºयांना प्रथम पैसे भरायला सांगितले. त्यातही रोख रक्कम स्वीकारत नव्हते. काहींनी रोख रक्कम विद्यापीठाच्या खात्यात जमा केली. 

विद्यापीठाने यानंतर ट्रांझिक्शन नंबर मागितला. त्यात स्टेट बँकेच्या चास (ता.नगर) येथील कर्मचा-यांनी शेतकºयांची अडवणूक केली. तांत्रिक मुद्दा उपस्थित करुन एकाच बँकेत आरटीजीएस अथवा एनएफटी होत नाही. यामुळे पैसे ट्रान्सफर होत नाही. परंतु जमा स्लीपवर ट्रांजिक्शन नंबर नसल्यामुळे अडचण आली. त्या दरम्यान अनेक शेतक-यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पैसे भरुन घेतले. फार्म सबमीट करायला गेले तर विद्यापीठातील सर्व बियाणे संपले आहेत,असे सांगितले. यामुळे अनेक शेतकºयांची निराशा झाली. आता शेतकºयांनी पैसे भरले, परंतु बियाणे मात्र मिळाले नाही.

 आता या शेतक-यांना पैसे कधी मिळणार? असा सवाल शेतकºयांनी केला आहे. बियाणे इतक्या लवकर कसे काय विकले? याची चौकशी करावी, अशी मागणी शेतक-यांकडून होत आहे. 

४२२० किलो कांदा बियाणे विक्री झाली. १० वाजता बियाणे विक्रीस सुरुवात केली. ते बियाणे एक तासात संपले. ज्या शेतक-यांनी आॅनलाईन पैसे भरले आहेत. त्यांना बियाणे भेटणार आहे. ज्यांनी आॅनलाईन प्रक्रिया व्यतिरिक्त पैसे भरले आहेत त्यांना बियाणे भेटणार नाही. -आनंद सोळंके, प्रमुख शास्त्रज्ञ, बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीuniversityविद्यापीठ