श्रीरामपूर : जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली माळवाडगाव येथे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत इंधनदरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी बैलगाडीतून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी सरपंच सागर मुठे, अक्षय नाईक, योगेश आसणे, सुरेश पवार, विशाल कांबळे, आकाश क्षीरसागर, सुदाम आसणे, दत्तात्रय दळे, विठ्ठल आसणे, रामेश्वर बोर्डे, नानासाहेब आसने, संजय आसणे, सुनील शिंदे, प्रमोद आसने उपस्थित होते.
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन व कोरोनाची स्थिती पाहता जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी बापू दले, उत्तम आसने, श्रीकांत दळे, पोलीस पाटील संजय आदिक, अशोक आसने, राजू दरेकर, दिगंबर आढाव, योगेश शिंदे, अशोक खताल, सोपान मुठे उपस्थित होते.
---------
१९ माळवाडगाव आंदोलन