तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील ग्रामदैवत नसरुद्दीन बाबा यांचा दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येणारा उरूस यात्रा उत्सव यावर्षी मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द केल्याची माहिती सरपंच जगन्नाथ लोंढे यांनी दिली. तालुका प्रशासनासह ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी सर्वानुमते यात्रा उत्सव रद्द ठेवण्याचा निर्णय घेतला. ग्रामदैवत नसरुद्दीन बाबा यांचा उरूस यात्रा-उत्सव शुक्रवारी (दि. २६) होणार होता. शुक्रवारी यात्रेच्या दिवशी कोणीही गाव परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन सरपंच लोंढे यांच्यासह बाजार समितीचे संचालक माणिकराव लोंढे, संजय चांडे, गोपीचंद गर्दे, जनार्दन शेंडे, सोन्याबापू लोंढे, सुरेश बफें, लक्ष्मण बानगुडे, दगडू हरी लोंढे, मुरलीधर लोंढे, अलीभाई शेख, चाँदभाई शेख, बबन शेख यांनी दिली आहे.
आडगावचा यात्रा उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:30 IST