शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

गरज लागल्यास निळवंडेसाठी वाढीव निधी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:20 IST

जलसंपदामंत्री पाटील यांनी शनिवारी (दि. २२) संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील निळवंडे धरणाच्या कालव्यावरील आढळा सेतू पुलाची पाहणी करत ...

जलसंपदामंत्री पाटील यांनी शनिवारी (दि. २२) संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील निळवंडे धरणाच्या कालव्यावरील आढळा सेतू पुलाची पाहणी करत कालव्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्यासमवेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, जिल्हा बँकेेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक सीताराम गायकर, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, संगमनेर विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, कार्यकारी अभियंता गिरीश सांगानी, प्रमोद माने, संगीता जगताप, गणेश नानोर आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या संदर्भाने अर्थसंकल्पात पहिल्यांदाच मोठी तरतूद केली आहे. कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणी असल्या तरी देखील कालव्यांची कामे होणे महत्त्वपूर्ण आहे. कामांना सतत गती मिळाली पाहिजे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निळवंडे धरण हा अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील अडथळे दूर करत प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. कालव्यांची कामे प्राधान्याने पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील चार-पाच तालुक्यांतील पाण्याचा प्रश्न कमी होणार आहे.

-----------------

पिढ्यांपासूनची मागणी आता पूर्ण होतेय

निळवंडे धरणाचे काम पूर्ण होण्याची काही पिढ्यांपासूनची मागणी पूर्ण होते आहे. धरणाचे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देणे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ज्या-ज्या वेळेस आम्हाला संधी मिळाली. त्यावेळेस निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली आहे. निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे पूर्ण होण्याकरिता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची मदत होते आहे. कालव्यांच्या कामांसाठी निधी देखील चांगला उपलब्ध होतो आहे. त्यासाठी आमचा सर्वांचा पाठपुरावा सुरू आहे. याचा परिणाम २०२२ च्या पावसाळ्यातील पाणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळेल, असा आमचा विश्वास आहे.

- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री

.......फोटो आहे......