जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १२१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४१८ आणि अँटिजेन चाचणीत ३७९ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ४, अकोले १६, जामखेड १, नगर ग्रामीण ३, पारनेर २६, पाथर्डी २९, राहता १, संगमनेर ७, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर १ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ४, जामखेड ४८, कर्जत ४४, कोपरगाव १९, नगर ग्रा. २६, नेवासा २७, पारनेर १७, पाथर्डी ११, राहता २४, राहुरी २४, संगमनेर ६७, शेवगाव ५८, श्रीगोंदा ६, श्रीरामपूर १७, कॅंटोन्मेंट ३ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत ३७९ जण बाधित आढळले. त्यात मनपा ७, अकोले २६, जामखेड १८, कर्जत ५८, कोपरगाव ११, नगर ग्रा. १८, नेवासा ७, पारनेर ५९, पाथर्डी २६, राहता १७, राहुरी १३, संगमनेर ३५, शेवगाव ३५, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
-------------
बरे झालेली रुग्ण संख्या : २,८६,३०८
उपचार सुरू असलेले रूग्ण : ५६८७
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६१६५
एकूण रुग्ण संख्या : २,९८,१६०