शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बदलीस अपात्र ६१ शिक्षकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 15:30 IST

आॅनलाईन बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील ६१ शिक्षकांनी दाखल केलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे. 

अहमदनगर : आॅनलाईन बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील ६१ शिक्षकांनी दाखल केलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या बदल्या अपात्र ठरविल्या आहेत. अपात्र शिक्षकांच्या कारवाईचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना बुधवारी सादर केला.शिक्षण विभागाकडून शिक्षकांनी दाखल केलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून ही तपासणी सुरू होती. बुधवारी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली. शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्यांबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तक्रारींवर मध्यंतरी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान शिक्षकांनी दाखल नव्याने पुरावे दिले होते. परंतु, त्याची खात्री केली असता ते बोगस असल्याचे आढळून आले. त्यामुळे शिक्षण विभागाकडून ६१ शिक्षकांना आपल्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशा अशयाच्या नोटिसा पाठविल्या असून, उर्वरित २० शिक्षकांचा निकाल राखीव ठेवला आहे. त्यावर मुख्यकार्यकारी अधिका-यांची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले.आॅनलाईन बदली करताना संवर्ग १ व २ मधील शिक्षकांना प्राधान्य दिले गेले. त्याचा लाभ जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतला. परंतु, त्यांच्यामुळे गैसोय झालेल्या शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर अक्षेप घेत तक्रारी केल्या़ त्याची दाखल जिल्हा परिषदेकडून घेण्यात आली.बोगस प्रमाणपत्रे दाखल केलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करून त्यांच्या जागी विस्थापित शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी शिक्षकांची मागणी आहे. अमरावती जिल्हा परिषदेने बोगस प्रमाणपत्रे दाखल केलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या असून, त्यांच्या बदल्या दुर्गम भागात केल्या आहेत. त्यामुळे विस्थापितांच्या आशा पल्लवित झाल्या असून, मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वजित माने अपात्र शिक्षकांवर काय कारवाई करतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.३२ शिक्षक पती-पत्नी एकत्रिकरणावर प्रश्नजिल्ह्यातील २९ शिक्षकांनी दाखल केलेल्या आरोग्याच्या प्रमाणपत्राच्या आधारे आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागाने प्रमाणपत्र दिलेले शिक्षक ठणठणतीत असल्याचा अहवाल दिला आहे. उर्वरित संवर्ग २ मध्ये ३२ शिक्षक पती-पत्नींनी एकत्रिकरण झाले असून, त्यांनी दिलेले दाखले चुकीचे असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे ३१ शिक्षक पती-पत्नींच्या एकत्रिकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद