श्रीगोंदा : तालुक्यातील घोटवी येथील जमीन खरेदीप्रकरणी बनावट जमीन मालक उभा करून बनावट खरेदी खत करून दीड कोटीची फसवणूक केल्या प्रकरणातील आरोपी कोमल विश्वजीत कासार यांचा जामीन अर्ज श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
कोमल विश्वजीत कासार (रा. वाळकी, जि. नगर) हिने जामीन अर्ज दाखल केलेला होता. या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायालयासमोर झाली. याबाबतची तक्रार चंद्रकांत कोल्हे यांनी केली होती.
सरकारी वकील सरोदे, मूळ तक्रारदारातर्फे ॲड. संतोष मोटे, बी. ए. नागवडे, संदेश जायभाय यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.
कोमल कासार व इतर आरोपी यांनी घोटवी येथील जमीन खरेदी प्रकरणी बनावट जमीन मालक उभा करून बनावट खरेदी खत करून दिले होते. त्या प्रकरणी मूळ तक्रारदार यांना १ कोटी ५५ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.