शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

दुर्गम शिखरे पादाक्रांत करणारी सह्याद्रीकन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 15:55 IST

ऊस तोड कामगारांची मुलगी अर्चना बारकू गडधे ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत मोठ्या भावाच्या अपघाती मृत्युचे दु:ख विसरून आई-वडिलांचा मुलगा बनून सह्याद्री पर्वतरांगेतील अनेक डोंगरकडे सर करण्याची किमया केली आहे़ आता ती माउंट एव्हरेस्ट सर करण्याची तयारी करत आहे. 

हरिहर गर्जे । पाथर्डी : ऊस तोड कामगारांची मुलगी अर्चना बारकू गडधे ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत मोठ्या भावाच्या अपघाती मृत्युचे दु:ख विसरून आई-वडिलांचा मुलगा बनून सह्याद्री पर्वतरांगेतील अनेक डोंगरकडे सर करण्याची किमया केली आहे. आता ती माउंट एव्हरेस्ट सर करण्याची तयारी करत आहे. जीवनातील संकटांना दुर्गम शिखरे समजून त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी अर्चनाने सह्याद्रीची कडे सर करत ट्रेकिंग करण्याचा मार्ग निवडला. आजपर्यंत वासीद (जि. ठाणे) येथील ३ हजार फूट उंचीचा वजीर सुळका सलग ३ वेळा सर करत विक्रम केला. रायगड किल्ल्याशेजारील समुद्र सपाटीपासून ३ हजार ५०० फूट उंचावर असलेला लिंगाणा अर्चनाने सहज सर केला. जीवधन किल्ल्याशेजारील ४५० फूट उंचीचे वानरलिंगी शिखरही तिने सर केले़. पुणे जिल्ह्यातील नानेघाटातील ३६० फूट उंचीचा नानाचा अंगठा, हरिहर किल्ल्याजवळील ४५० फूट उंचावरील स्कॉटीशकडा, मनमाड येथील १२० फुटावरील हडबीची शेंडी, माकडनाळ वाटेने सलग १९ तासाची यशस्वी चढाई करत हरिश्चंद्रगडही तिने सर केला आहे़. पॉर्इंट ब्रेक एडव्हेंचर ग्रुप नाशिक यांच्या मदतीने महिला दिनानिमित्त पुन्हा एकदा नवीन विक्रम स्थापित करण्यासाठी वजीर सुळका सर करत आहे. धुणीभांडी करून गाठले ज्ञानाचे शिखरअर्चना ही पाथर्डी तालुक्यातील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात कला शाखेत तृतीय वर्षात शिक्षण घेत असून एनएसएसमधून २६ जानेवारी २०२० रोजीच्या दिल्ली राजपथ संचलनासाठीही तिची निवड झाली होती. कॉलेजमध्ये कमवा व शिका योजनेत काम करुन शिक्षणाचा खर्चही ती उचलण्याचा प्रयत्न करीत आहे़. तसेच महाविद्यालयातील शिक्षिकेच्या घरी धुणी, भांडी, स्वयंपाक करून अर्चना स्वत:च्या शिक्षणाला हातभार लावत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरTrekkingट्रेकिंगPathardiपाथर्डी