शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शिरूरजवळ अपघात : एकाच कुटूंबातील चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 18:47 IST

नगर पुणे महामाार्गावर शिरुर जवळील बाह्यमार्गावर पहाटे चारच्या सुमारास झालेल्या कार व कंटेनरच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यु झाला.

देवदैठण : नगर पुणे महामाार्गावर शिरुर जवळील बाह्यमार्गावर पहाटे चारच्या सुमारास झालेल्या कार व कंटेनरच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यु झाला. मृतांमध्ये दोन सख्या भावांसह आई व २० दिवसांच्या नवजात बालकाचा समावेश आहे. आश्चर्यकारक बचावलेली मुलगी अन घटनास्थळावरील दृश्य पोलीसांसह अनेकांचे मन हेलावुन टाकणारे होते.नगर - पुणे महामार्गावर शिरुर नजीक (दि.२१) रोजी पहाटे चारच्या सुमारास रस्त्यावर बंद पडलेल्या मालवाहु कंटेनर(आर.जे.०५ जी.बी.२४३३) ला कार (एम.एच.१२ क्यु. डब्ल्यु ८५०२) पाठीमागून धडकली. रस्त्यावर अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. अपघातात किशोर माधव हाके (वय.३२), लिंबाजी उर्फ शुभम माधव हाके (वय.२५), विमलबाई माधव हाके (वय.६०) तसेच २० दिवसाचे नवजात बालक (सर्व सध्या रा.रायसोनि कॉलेज पाठीमागे,वाघोली,पुणे, मुळ रा.रामतिर्थ ता.लोहा, जि.नांदेड) यांचा जागीच दुदैर्वी मृत्यु झाला. तर पुष्पा किशोर हके(वय.२५) या जखमी झाल्या असुन त्यांच्यावर शिरूर येथे उपचार सुरु असुन प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कंटेनर मधील डिझेल संपल्याने कंटेनर रस्त्यावर बंद पडला होता, अशी माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली.घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्यासह पोलीस कर्मचारी जनार्दन शेळके, रविंद्र पाटमास, कृष्णा व्यवहारे, संजय जाधव, उमेश भगत, करणसिंग जारवाल, हेमंत शिंदे, अभिषेक ओहोळ, सुरेश नागलोथ, गजानन जाधव यांसह स्थानिक नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. अपघाताची खबर रमेश चौधरी यांनी दिली.देव तारी त्याला कोण मारीऔरंगाबाद येथे किशोर हाके यांना मुलगा झाला होता. बायकोला व मुलाला पुन्हा सध्या राहत असलेल्या ठिकाणी वाघोली येथे घेउन येण्यासाठी किशोर, शुभम, त्यांची आई विमलबाई, लहान भाची हे औरंगाबाद ला गेले होते. औरंगाबाद येथुन राञी कारने किशोरची पत्नी व नवजात बाळ यांना घेउन कुटुंबिय पुन्हा वाघोलीकडे येत होते. दरम्यान शिरुर जवळच काळाने त्यांच्यावर झडप घातली. कंटेनर व कारमध्ये झालेल्या अपघाताची तिव्रता इतकी होती कि कारचा चक्काचुर झाला. माञ कार मध्ये असलेली बजरंग हलगुडे हि चार वर्षांची मुलगी सुदैवाने वाचली. अपघातात वाचलेल्या समृद्धी हिला किरकोळ जखम वगळता फारसे लागले नाही.अपघात झाल्यानंतर कार मध्ये अडकलेल्या समृद्धीला बाहेर काढल्यानंतर नातेवाईक येइपर्यंत शिरुर पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात शिरुर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी पोलीस नाईक उषा अनारसे, विद्या बनकर, मोनिका जाधव, रेश्मा गाडगे, शितळ गवळी यांनी त्या मुलीचा सांभाळ केला. यावेळी वाचलेली चार वर्षांची मुलगी जखमी पुष्पा हाके व एकाच कुटुंबातील मयत चार व्यक्ती हे दृश्य पाहुन अनेकांना भावना आवरता येत नव्हत्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर