शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या बैठकीला दांडी; १२ बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 04:40 IST

अनुदान वाटप आढावा : शासनाच्या आदेशांचे केले उल्लंघन

अहमदनगर : शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान वाटप संदर्भात जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीला बँकेच्या अधिकाºयांनी दांडी मारल्याने जिल्ह्यातील बारा बँकांच्या अधिकाºयांविरोधात शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाआहे़

याप्रकरणी गृह शाखेच्या नायब तहसीलदार माधुरी आंधळे यांनी शनिवारी नगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ सध्या जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. या पार्श्वभूमीवर शेतकºयांसाठी आलेल्या अनुदानाच्या वाटपाची स्थिती काय आहे, याबाबत १७ मे रोजी आढावा बैठक झाली. ही बैठक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आयोजित केली होती. या बैठकीबाबत संबंधित बँकांना निरोप देण्यात आले होते. बैठकीला मात्र १२ बँकांच्या अधिकाºयांनी दांडी मारल्याने त्यांच्याविरोधात कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नेहा जोशी (आंध्रा बँक), मंगेश कदम (इंडियन बँक), चरणदीप (ओरिएन्टल बँक), माने, (पंजाब नॅशनल बँक), जी. के. देशपांडे (युनियन बँक), सातपुते (महाराष्ट्र ग्रा़ बँक), वसंत पिल्लेवार (देना बँक), गोविंद झा (विजया बँक), सुयोग ब्राह्मणे (युनायटेड बँक), धीरज (अलाहाबाद बँक), विकास निकाळजे (स्टेट बँक), गायकवाड (व्यवस्थापक जिल्हा सेंट्रल बँक) यांचा समावेश आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे पुढील तपास करत आहेत़बँकांना दुष्काळाचे गांभीर्य नाही; पालकमंत्र्यांनाही दिली नाही दाददुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील ६ लाख ३६ हजार ७९० शेतकºयांना आचारसंहितेपूर्वी अनुदान वाटप करण्यात आले आहे़ उर्वरित शेतकºयांना मात्र अद्याप अनुदानाचे वाटप झालेले नाही़ तसेच शेतकºयांनी पीक विमा, दुष्काळ अनुदान संदर्भात बँक कर्मचाºयांची मुजोरी आदी संदर्भात तक्रारी केल्या होत्या़ १३ मे रोजी पालकमंत्री राम शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत बँक अधिकाºयांनी तातडीने शेतकºयांसाठी आलेले पैसे त्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानंतर पालक सचिव आशिषकुमार सिंह यांनीही पाच दिवसांपूर्वी टंचाई आढावा बैठक घेतली होती़ त्यांनीही बँकांना शेतकºयांचे पैसे तातडीने वर्ग करण्याचे आदेश दिले होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी बँकेच्या अधिकाºयांची बैठक बोलाविली होती़ या सभेलाच बँकेच्या अधिकाºयांनी दांडी मारत हा विषय गांभीर्याने घेतला नाही़

टॅग्स :droughtदुष्काळ