शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

टँकर पलटी होताच उडाली झुंबड; डिझेल भरण्यासाठी टिप, ड्रमसह नागरिकांची अपघातस्थळी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:30 IST

सांडलेले डिझेल आणि टँकरमध्ये उरलेले डिझेल काढून घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटांतच अपघातस्थळी तोबा गर्दी झाली.

अहिल्यानगर: चास गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिझेलचा टँकर पलटी झाला. यावेळी संपूर्ण रस्त्यावर डिझेल सांडले होते. याप्रसंगी अपघातग्रस्त चालकाला मदत करण्याऐवजी परिसरातील ग्रामस्थांसह प्रवाशांनी डिझेल भरण्यासाठी ड्रम, टिपाड, दुधाचे कॅन, एव्हढेच नव्हे, तर पाण्याच्या बाटल्याही घेऊन अपघातस्थळी गर्दी केली होती. त्यामुळे वाहतूककोंडीत आणखी भर पडली. रविवारी दुपारी २ वाजता ही घटना घडली.

नगर-पुणे महामर्गावर पुणेकडून नगरच्या दिशेने येणारा डिझेलचा टँकर रविवारी दुपारी चास गावाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. हा टँकर रस्त्यावर आडवा पडल्याने एका मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. यावेळी टँकरमधील डिझेल रस्त्यावर सांडले. हे सांडलेले डिझेल आणि टँकरमध्ये उरलेले डिझेल काढून घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटांतच अपघातस्थळी तोबा गर्दी झाली. दरम्यान या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला मिळाल्यानंतर घटनास्थळी तत्काळ अग्निशमन बंब रवाना करण्यात आला. सांडलेल्या डिझेलला आग लागू नये, यासाठी प्रथम बंबातून फॉग मारण्यात आला. त्यानंतर पाणी मारण्यात आले. डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या. दरम्यान या घटनेत चालक किरकोळ जखमी झाल्याचे समजते.

रुग्णवाहिका थांबून डिझेल भरण्याची धडपडरस्त्यावर डिझेलचा टैंकर पलटी झाला, तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या दोन्ही बाजूने काही वाहनचालकांनी वाहन थांबून डिझेल मिळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तर एका रुग्णवाहिका चालकानेही रुग्णवाहिका थांबवून जवळ असलेल्या ड्रममध्ये डिझेल घेण्याची धडपड केली. विशेष म्हणजे डिझेल भरण्यासाठी काही महिलाही अपघातस्थळी प्रयत्न करताना दिसून आल्या.

पोलिस आल्यानंतर वाहतूक सुरळीतडिझेलचा टँकर पलटी झाला, तेव्हा अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने दीड ते दोन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुणीच प्रयत्न केले नाही. मात्र, डिझेल मिळविण्यासाठी बहुतांशी जण धडपडताना दिसले. नगर तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही वेळाने ही वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरAccidentअपघात