शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेणाऱ्या अभियंत्यास सक्तमजुरीसह ८५ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 14:49 IST

रस्त्याच्या कामांची बिले काढण्यासाठी ठेकेदाराकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी पंचायत समितीचे शाखाअभियंता अशोक मुंढे यांना श्रीरामपूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.यु.बघेले यांनी शुक्रवारी १० वर्षे सक्तमजुरी व तब्बल ८५ लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये देण्यात आलेला राज्यातील हा ऐतिहासिक निकाल ठरला आहे. 

ठळक मुद्देश्रीरामपूर पंचायत समिती जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

श्रीरामपूर : रस्त्याच्या कामांची बिले काढण्यासाठी ठेकेदाराकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी पंचायत समितीचे शाखाअभियंता अशोक मुंढे यांना श्रीरामपूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.यु.बघेले यांनी शुक्रवारी १० वर्षे सक्तमजुरी व तब्बल ८५ लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये देण्यात आलेला राज्यातील हा ऐतिहासिक निकाल ठरला आहे. न्यायालयाने याप्रकरणी गुरूवारीच मुंढे यांना दोषी ठरविले होते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी ही शिक्षा सुनावण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ अन्वये सात वर्षे सक्तमजुरी व ३५ लाख रूपये दंड व दंड न भरल्यास दीड वर्षे अधिकचा कारावास तसेच याच कायद्याखालील कलम १३ (१) (ड) व १३ (२) अन्वये १० वर्षे सक्तमजुरी व ५० लाख रूपये दंडाची शिक्षा व दंडाची रक्कम न भरल्यास अडीच वर्षे कैद असे या शिक्षेचे स्वरूप आहे. मुंढे यांना ही शिक्षा एकत्रीत भोगावी लागणार आहे.सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड.भानुदास तांबे यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. पी.पी.गटणे यांनी सहाय्य केले. सरकारी पक्षास हवालदार एकनाथ जाधव, लाचलुचपत प्रतिबंधकचे हवालदार प्रशांत जाधव यांची मदत झाली. या ऐतिहासिक निकालामुळे भ्रष्ट लोकसेवकांवर मोठी जरब निर्माण होईल, असा विश्वास सहायक सरकारी वकील भानुदास तांबे यांनी व्यक्त केला आहे.

ठेकेदार जुनेद शेख यांनी श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव-खानापूर रस्त्याचे काम पूर्ण केले. या कामाचे बिल अदा करण्यास व त्याचबरोबर शेख यांना तत्पूर्वी अदा केलेल्या काही बिलांपोटी शाखाअभियंता मुंढे यांनी दीड लाख रूपये लाचेची मागणी केली.  त्यासंदर्भात मे २०१६ मध्ये शेख यांनी नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाचे पोलीस  उपअधीक्षक आय.जी.शेख यांनी पथकासह सापळा रचून संगमनेर रस्त्यावरील सरकारी विश्रामगृहात मुंढे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. खटल्यात चार साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. तक्रारदार जुनेद शेख, जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस निरीक्षक इरफान शेख, पंच गणेश वाघिरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग