शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ७०० बालके कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 14:53 IST

घरातील हडकुळ्या पोरांना धडधाकट बनविण्यासाठी वेगवेगळे टॉनिक देण्यावर पालकांचा भर असतो. मात्र तीव्र कुपोषित बालकांना अत्यल्प खर्चात तंदुरुस्त बनविण्याची मोहीम अंगणवाडी ताईमार्फत ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहे.

अहमदनगर: घरातील हडकुळ्या पोरांना धडधाकट बनविण्यासाठी वेगवेगळे टॉनिक देण्यावर पालकांचा भर असतो. मात्र तीव्र कुपोषित बालकांना अत्यल्प खर्चात तंदुरुस्त बनविण्याची मोहीम अंगणवाडी ताईमार्फत ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहे. मोड फुटलेले गहू व हिरवे मुग वाळवून त्यापासून शिरा, धिरडे यासारखे अमायलेजयुक्त सरकारी खुराक बालकांना सुरू करण्यात आला असून, जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांना आहार देऊन दोन महिन्यांत बालके तंदुरुस्त बनविणार असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने केला आहे.शासनाने कमी वजनाच्या तीव्र कुपोषित बालकांसाठी खास ग्राम बालविकास केंद्र सुरू केले आहेत. तीव्र कुपोषित बालकांना अंगणवाडीत पाचवेळा तर घरी तीनवेळा, असा दिवसभरात आठवेळा पौष्टिक आहार बाल ग्रामविकास केंद्रातून दिला जाणार आहे. जिल्ह्यात एकूण ७०० तीव्र कुपोषित बालके आहेत. त्यांना दोन महिन्यांत तंदुरुस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात ४५० अंगणवाड्यांमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथे केंद्र सुरू करण्यात आले असून, टप्प्या-टप्प्याने अन्य तालुक्यांतही केंद्र सुरू होणार आहेत. केंद्र चालविण्यासाठी स्वतंत्र निधी नाही़ पण, प्रति बालक प्रति दिवस २५ रुपये, याप्रमाणे अनुदान आंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यातील साडेचारशे अंगणवाडी सेविकांच्या कुपोषित बालकांच्या आहारासाठी १० लाख रुपये जमा झाले आहेत. बँक खात्यावर जमा झालेल्या पैशातून अंगणवाडीताई कुपोषित बालकांना दिवसभरात पाचवेळा पौष्टिक आहार देणार आहेत.शासनाने अंगणवाडीतार्इंना आहाराची संहिता दिली आहे. ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना अमायलेजयुक्त पिठाचा शिरा, उपमा किंवा धिरडे बनवून दिले जाणार आहेत.अंगणवाडीतील तीव्र कुपोषित बालकांना पाचवेळा हा पौष्टिक आहार दिला जाईल. त्यानंतर घरी तीनवेळचा आहार कसा द्यावा, याबाबत अंगणवाडीताई बालकांच्या मातांना मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत बालकांची सलग सात दिवस नियमित तपासणी होईल. आहाराबरोबर वैद्यकीय उपाचारही कुपोषित बालकांवर केले जाणार आहेत.असे बनवा अमायलेजयुक्त पीठगहू किमान २४ तास पाण्यात भिजवावेमोड आल्यानंतर गहू उन्हात वाळवावाळल्यानंतर गहू दळून घ्यावेतपिठापासून धिरडे,शिरा, उमपा आदी पदार्थ तयार करावेत़हिरवे मुग किमान १२ तास पाण्यात भिजवामोड आलेले मुग उन्हात वाळवावाळलेले मुग दळून घ्यावेतपिठापासून मुलांच्या आवडीनुसार पदार्थ तयार करावेअशी आहे आहारसंहितासकाळी ८ वा - अमायलेजयुक्त पिठाचा शिरासकाळी १० वा - अंगणवाडीतील आहारदुपारी १२ वा - अंगणवाडीतील आहारदुपारी ४ वा - एक बटाटा, अंडे, केळीसायंकाळी ६ वा - अमायजेलयुक्त पिठाचा शिरारात्री ८ वा - घरचे जेवण 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद