शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar: अहमदनगर जिल्हा परिषदेचा ७ कोटींचा टंचाई कृती आराखडा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 22:10 IST

Ahmednagar: यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई कृती आराखडा तयार करून त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतली आहे.

अहमदनगर : यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये म्हणून जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई कृती आराखडा तयार करून त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात मार्चनंतर ३२१ गावे आणि १ हजार ३९ वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई जाणवू शकते. यासाठी ७ कोटी ३७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यात टँकरसाठी साडेसहा कोटी तर विहिरी अधिग्रहणासाठी ८१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पाणीपुरवठा विभागाकडून टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार यंदा ७ कोटी ३७ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यात बुडक्या खोदणे, विहीर खोल करणे, गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे, पाण्याचे टँकर भरण्यासाठी उद्भव निश्चित करून ठेवणे, टँकर अथवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, प्रगतिपथावरील योजना तातडीने पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करणे, नवीन विंधन विहिरी घेणे, तात्पुरत्या नळ योजना घेणे आदी उपाययोजनांचा समावेश असतो. परंतु सद्य:स्थितीत केवळ विहिरी अधिग्रहित करणे, टँकर भरणे व पुरवठा करणे, नळ योजना विशेष दुरुस्ती या चार उपाययोजनांवरच तरतूद केलेली आहे. ७.३७ कोटींचा आराखडा मंजूरयंदा जिल्हा परिषदेने ७ कोटी ३७ लाख ५२ हजार खर्चाचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यात खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी ८१ लाख ४५ हजार, टँकर भरण्यासाठी २१ लाख २३ हजार, टँकरद्वारे, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ६ कोटी ३२ लाख, नळ योजना विशेष दुरुस्तीसाठी २ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. ३२१ गावांची तहान भागणारजिल्ह्यातील प्रस्तावित ३२१ गावे व १,०३९ वाडी-वस्तींचा टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यात सर्वाधिक १ कोटी ५५ लाखांची तरतूद संगमनेर तालुक्यात, त्यानंतर १ कोटी १७ लाख नगर तालुका, ९७ लाख जामखेड, ७७ लाख कर्जत, तर ५९ लाखांची तरतूद अकोले तालुक्यासाठी करण्यात आली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAhmednagarअहमदनगर